Hasan Mushrif and Sunil Tingre Sarkarnama
पुणे

Sasoon Hospital News : 'तावरेंची नियुक्ती मुश्रीफ, टिंगरेंच्या पत्रावरूनच' ; ससूनच्या 'डीन'चा स्फोटक खुलासा!

Hasan Mushrif and Sunil Tingre: यामुळे या प्रकरणाचा फास आता टिंगेर मुश्रीफांच्या दिशेने वळल्याचे दिसत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sassoon Dean Vinayak Kale : पुणे पोर्शे अपघात प्रकरण सध्या राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, याप्रकरणाशी संबंधित दररोज नवनवीन खळबळजनक घडामोडी, खुलासे आणि माहिती समोर येत आहे.

कारण, ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनीच बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलास म्हणजेच कार अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते गायब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर आता या प्रकरणात चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचीही नावे पुन्हा एकदा समोर आली आहेत.

अजय तावरेसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी 2023मध्ये शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे. ससूनच्या अधीक्षकपदी तावरेंची नियुक्ती करण्यासाठी टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांना(Hasan Mushrif) पत्र लिहिले होते. यानंतर मुश्रीफ यांच्या आदेशानुसार मी तावरे यांना कार्यरभार दिला असल्याची माहिती आता ससूनचे अधिष्ठातांनी दिली. 'मुश्रीफ यांनी लिहिलेले होते की त्यांना कार्यभार द्या. म्हणून मी सही केली. मंत्री महोदयांचे आदेश मी पाळले.' असं ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांनी स्पष्ट केलं आहे. यावरून एकप्रकारे तावरेंच्या नियुक्तीमागे मंत्री मुश्रीफ आणि आमदार टिंगरे असल्याचे त्यांनी दर्शवल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी ससूनचे डीन डॉ. विनायक काळे(Vinayak Kale) यांनी पत्रकार परिषद घेतली. ससून चौकशी समितीने काल केलेल्या चौकशी संदर्भात माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. ससून रुग्णालयातील आतापर्यंत 3 कर्मचाऱ्यांना करण्यात अटक आली आहे. शिवाय ससून रुग्णालय प्रशासनावर लावण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. यावेळी डॉ. विनायक काळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

'डॉ. अजय तावरे(Ajay Taware) यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. डॉ. विजय जाधव यांच्याकडे चार्ज दिला आहे. अतुल घटकांबळे हा शिपाई आहे. त्याला निलंबित केलं आहे. श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने 28 तारखेला सेवा समाप्त करण्यात आली आहे, असं विनायक काळे म्हणाले.

याशिवाय 'डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणार कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केलं आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने फेरफार करणं चुकीचं आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे. कालच्या चौकशी समितीसोबत मी नव्हतो. ससूनमधील एकूण 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.', असंही विनायक काळे यांनी सांगितलं

तसेच 'ससून(Sasoon Hospital) मध्ये होत असलेल्या मृत्यू बाबत एक समिती स्थापन केली आहे. ही समिती एक अहवाल देईल रोज मृत्यू का होतात. पुण्या बरोबर जे शासकीय हॉस्पिटल आहेत त्याची पण मृत्यू आकडेवारी पाहू. असं त्यांनी सांगितलं.

या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न - सुनील टिंगरे

'माझ्या शिफारस पत्रावरून दिवस सुरू असलेली चर्चा ही या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. लोकप्रतिनिधी या नात्याने अनेकांना विविध कामासाठी शिफारस पत्र द्यावे लागते. प्रत्येक पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळे वळण देणे योग्य ठरणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल.' असं आमदार सुनील टिंगरे(Sunil Tingre) यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT