Datta Ganjale joins Shiv Sena Sarkarnama
पुणे

Shivsena News : उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का; साथ सोडलेल्या आंबेगावातील नेत्याने धरली शिंदेंच्या शिवसेनेची वाट

Datta Ganjale joins Shiv Sena : गांजाळे हे गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहत होते. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती.

डी. के. वळसे पाटील

Manchar, 30 June : पुणे जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आंबेगावच्या तालुकाप्रमुखांनी आपल्या समर्थकांसह ठाकरेंची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अगोदरच कमकुवत झालेली ठाकरेंची शिवसेना आंबेगावमध्ये आणखी कमकुवत झाली आहे.

माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव तालुक्यावर वर्चस्व आहे. मात्र, मंचर शहरात शिवसेनेची ताकद मोठी होती. वळसे पाटील यांचे सारखे बलाढ्य नेते असूनही मंचरमध्ये शिवसेनेचा सरपंच झाला होता, त्यामुळे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena UBT) सोडणे धक्कादायम मानले जात आहे. या प्रवेशामुळे मंचर परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबेगाव तालुका प्रमुख तथा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे (Datta Ganjale) यांनी शुक्रवारी (ता. २७ जून) पक्षाच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला हेाता. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशाला शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, आमदार शरद सोनवणे, उपनेत्या सुलभा उबाळे, सरपंच रवींद्र वळसे पाटील, युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सचिन बांगर उपस्थित होते.

दरम्यान, गांजाळे हे गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहत होते. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यांनी मंचरमध्ये उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बॅनर वापरला नव्हता. तेव्हापासूनच ते पक्षाला जय महाराष्ट्र करतील, अशी चर्चा सुरू होती.

शिवसेना प्रवेशानंतर दत्ता गांजाळे म्हणाले, मंचर शहरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १०० कोटींपेक्षा अधिकचा निधी दिला आहे. यापुढे निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे, त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांचा लवकरच आंबेगावमध्ये दौरा होणार आहे, त्या वेळी आणखी काही प्रवेश होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत प्रवेश केलेले दत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेनेत मानसन्मान देण्यात येईल. आपण आंबेगाव तालुक्याचा लवकरच दौरा करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भगवा फडविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT