Indrayani River Bridge Sarkarnama
पुणे

Indrayani River Bridge Collapsed : इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यातील पूल कोसळण्याचे धक्कादायक कारण आले समोर !

Kundmala Bridge Accident News : या पुलाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी दुपारी कोसळला. अचानक पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळल्याने 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आजच्या आहे. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या दोन तुकड्या आल्या असून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पुलाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. मात्र हा कुंडमळ्यातील पुल कोसळण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेला हा पूल 30 वर्षापूर्वीचा आहे. दुर्घटनाग्रस्त पूल हा लोखंडी होता. या पुलावर एकाच वेळी जास्त नागरिक आले होते, परिणामी पर्यटकांचे वजन जास्त झाल्याने जीर्णावस्थेत असलेला हा पूल क्षणात कोसळला. पर्यटकांच्या वजनामुळे या पुलाचे थेट दोन तुकडे झाले, असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत या भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे इंद्रायणी नदी सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या घटनेनंतर पर्यटक वाहत्या पाण्यात पडल्याने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुंडमळा येथील हा पूल जीर्णावस्थेत होता. त्यातच या पुलावरून दुचाकी नेल्या जात होत्या. अपघातावेळीही या पुलावरून दुचाकी जात होती. त्यासोबतच पर्यटकही एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जात होते. हा पूल हवेतही हलत होता. या पुलावरील वजन वाढल्याने हा लोखंडी पूल क्षणात कोसळण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

दरम्यान, रविवार असल्याने सुट्टी होती. त्यामुळे कुंडमळा हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढले होते. हा पूल अगोदरच जीर्ण झालेला होता. त्यामुळे तो अचानकपणे कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक अचानक इंद्रायणी नदीत कोसळले. यामधील काही जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ही दुर्घटना झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या जवानांना आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. दुर्घटनास्थळी 20 ते 25 रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वाहून गेलेले पर्यटक नेमके किती दूर गेले असतील, याचा अंदाज एनडीआरएफच्या जवानांकडून घेतल जात आहे आणि बचावकार्य केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT