Udhhav Thackeray, Sonia Gandhi Sarkarnama
पुणे

Udhhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे 'इटालियन शक्ति'समोर लोटांगण; भाजपने सगळेच काढले

Chandrashekhar Bawankule : ठाकरेंना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याना मत : बावनकुळे

Sudesh Mitkar

Pune Political News : उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 'हर मंदिर स्वच्छता' या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात झाला. यावेळी बावनकुळेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. तसेच राज्यातील प्रत्येक मंदिरात हे अभियान राबविण्याचा संकल्पही बोलून दाखवला.

बावनकुळे म्हणाले, 'काँग्रेस पक्षाने नेहमी देशातील हिंदू समाजाचा अपमान केला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना काँग्रेसने रामाचा जन्म काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि इटालियन शक्तिसमोर लोटांगण घातले आहे,' असा टोलाही लगावला.

'दरम्यान, इंडिया आघाडी सत्तेत आल्यास हिंदुस्थानातील सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेली आहे. या आघाडीचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घटक आहेत. याचाच अर्थ ठाकरेंना मत म्हणजेच हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असा होतो,' असे म्हणत बावनकुळेंनी महायुतीत येण्यासाठी आघाडीतील नेते रांगेत उभे असल्याचा दावाही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आगामी काळात महाराष्ट्राला मोठे राजकीय हादरे बसतील. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत, जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येत आहे. चीनसारख्या शत्रू राष्ट्रानेही ते कबूल केले आहे. मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत,' अशी ऑफरच बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.

राज्यात जिल्हानिहाय महायुतीचे मेळावे सुरू झाले असून पुढच्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळावे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 'हर मंदिर स्वच्छता अभियाना'ला देशातील जनता उत्स्फूर्तपणे सहयोग देत आहे. 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. या कालावधीत सर्व समाजातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी असे उपक्रम राबविले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असून, सर्व राजकीय पक्षांनी त्यात सहभागी व्हावे,' अशी अपेक्षा बावनकुळेंनी बोलून दाखवली.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि राममंदिर अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, सुनील देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT