Vijay Shivtare-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Loksabha Constituency : ‘आता सगळ्यांनी मिळून पवारांना पाडा; होऊद्या एकदा त्यांचा कार्यक्रम’

Vijay Shivtare Appeal : मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जाहीरपणे सांगून विजय शिवतारे यांचा पुरंदरमध्ये पराभव केला होता. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय जगताप यांना राष्ट्रवादीने बळ दिले होते. त्या लढाईत शिवतारे यांचा पराभव झाला होता. त्याची सल अजूनही शिवतारे यांच्या मनात कायम आहे.

Vijaykumar Dudhale

Pune News : शिवसेना उपनेते विजय शिवतारे यांनी मागील निवडणुकीतील पराभवाची खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील निवडणुकीच्या वेळी केलेल्या विधानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे सांगून एकदा इतिहास घडू द्या. त्यांनी आतापर्यंत याला पाड, त्याला पाड असं केलं आहे. आता सगळ्यांनी मिळून यांना (पवारांना) पाडा, होऊद्या एकदा त्यांचा कार्यक्रम’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

सासवड (ता. पुरंदर Purandhar) येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम माजी मंत्री शिवतारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात शिवतारे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बाहेर काढली आहे. ते म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) यांनी याच सासवडच्या पालखीतळावर विजय शिवतारे (Vijay Shivtare), तू निवडून कसा येतो, ते मी पाहतो, असे विधान केले होते. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. पवारांनी याच पालखीतळावर येऊन पुरंदरच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढचं रणांगण आता मोकळं आहे. दोन पवार व्हर्सेस विजय शिवतारे भोर, इंदापूर, पुरंदर येथील सगळे. त्यांनी आतापर्यंत याला पाड, त्याला पाड, असंच केले आहे. आता सगळ्यांनी मिळून एकदा यांना (पवारांना) पाडा. होऊद्या ह्यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या, असे आवाहन शिवतारे यांनी केले.

मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जाहीरपणे सांगून विजय शिवतारे यांचा पुरंदरमध्ये पराभव केला होता. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय जगताप यांना राष्ट्रवादीने बळ दिले होते. त्या लढाईत शिवतारे यांचा पराभव झाला होता. त्याची सल अजूनही शिवतारे यांच्या मनात कायम आहे.

महाविकास आघाडी सरकार असतानाही याच शिवतारे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्यावर कशा प्रकारे अन्याय केला होता, हे जाहीरपणे सांगितले होते. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतर वेगवेगळ्या व्यासपीठावर शिवतारे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली होती. आता महायुतीकडून बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत, त्यामुळे शिवतारे यांनी अजित पवार विरोधाची धार धारदार केली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT