Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव चर्चेत, शरद पवारांनी दिली वेगळीच माहिती

India Alliance : 1977 च्या निवडणुकीचा संदर्भ देत पवारांनी वर्तवली वेगळीच शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Pune : 'इंडिया' आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव चर्चेत आहे. नितीशकुमार यांनी या नावाला विरोध केल्याची देखील चर्चा होते आहे. मात्र, 1977 च्या निवडणुकीचा संदर्भ देत निवडणुकीनंतर पक्ष स्थापन झाला आणि ज्यांचे नाव चर्चेत नव्हते ते मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, असे सांगत निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करू, असे संकेत शरद पवार यांनी दिली.

एका सर्व्हेमधून महायुतीला महाराष्ट्रात 20 ते 21 जागा मिळतील तर आघाडीला 26 ते 28 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर शरद पवारांनी सर्व्हेला गंभीरपणे घ्यायला नको, ते केवळ दिशादर्शक असतात, असा आपला व्यक्तिगत अनुभव असल्याचे सांगितले. शिवाय, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व्हे वेगळे होते आणि निकाल वेगळा लागला याची आठवण देखील शरद पवार यांनी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे कुस्तीगीर महासंघाच्या विरोधात आंदोलन करत होते साक्षी मलिक यांनी कुस्तीतून निवृत्ती घोषित केली. तर, बजरंग पुनिया याने आपला पुरस्कार परत केला. त्यानंतर केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. यावर शरद पवार म्हणाले, हा निर्णय घ्यायला उशीर झाला आहे. देशाच्या मुलींनी जे कर्तृत्व दाखवले, जे यश मिळवले त्यांना आक्षेपार्ह वागणूक देण्यात आली. अशा घटनाविषयी आधीच निर्णय घ्यायला हवा होता.

'आपण बंड करायला उशीर केला. काहींनी वयाच्या 38 व्या वर्षी बंड केले' असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. ते बंड नव्हते. आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला होता. याआधी मी बारामतीमध्ये लक्ष घालत नव्हतो. तेथे निर्णय घेण्याचे अधिकार तेथील लोकांना दिले होते, असे देखील पवार म्हणाले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT