Aditya Thackeray Sarkarnama
राज्य

Disha Salian Case : 'डर अच्छा है'..! ; भाजप घाणेरडे प्रकार करत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप..

Amol Sutar

Disha Salian Case : भाजपच्या मनात आमची एव्हढी भिती वाढली आहे. पण मी एव्हढच सांगेन डर अच्छा है..! अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याच्या लेखी आदेशावर प्रतिक्रीया दिली.

ते पुढे म्हणाले, ज्या - ज्या वेळेला भाजप BJP ला भिती वाटत असते, तेव्हा असे घाणेरडे प्रकार करत असतात. इथेच नव्हे तर जगभरात ज्यांची त्यांना भिती वाटते त्यांची ते बदनामी करतात. हे सगळे प्रकार त्यांचे सुरु असतात. प्रत्येक अधिवेशनावेळी हे असं वातावरण निर्माण करतात. त्याच्या मनात आमची एव्हढी भिती वाढली आहे.

पण मी एव्हढच सांगेन डर अच्छा है.. देशभरात जे - जे सत्त्यासाठी लढत आहेत, सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत. त्यांना अशा पद्धतीने सतवलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी भाजपवर केला आहे. दरम्यान, याआधी दिशा सालियन Disha Salian मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता.

दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला असल्याने यात कोणताही राजकीय अँगल नसल्याचा सीबीआयनं निष्कर्ष काढला होता. त्यानंतर दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. तसेच, याप्रकरणी आदित्य ठाकरें Aditya Thackeray चीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश प्राप्त झाले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया देत भाजप घाणेरडे प्रकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

( Edited by Amol Sutar )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT