Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Madha Loksabha : माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवारांचे भाष्य; ‘तुम्ही कशाला नको ते....’

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीमधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तुम्ही आम्हाला नाही ते प्रश्न का विचारता? असा उलटा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar's Comment on Madha Lok Sabha Constituency)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सिद्धरामेश्वराचे दर्शन घेऊन पवार यांनी सोलापूर दौऱ्याला सुरुवात केली. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे का घेतला जात नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर का आम्हाला तुम्ही नाही ते प्रश्न विचारता, असे म्हणत आम्ही तीनही पक्ष एकत्र मिळून माढ्याच्या जागेबाबत तोडगा काढू, असे स्पष्ट केले.

वास्तविक, माढ्यातून भाजपच्या तिकिटावर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव केला होता. आता भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोण लढवणार, याबाबत उत्सुकता आहे. त्यावर भाष्य करणे पवार यांनी टाळले आहे.

भाजपमध्येही मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये तिकिटासाठी गेल्या वर्षभरापासून स्पर्धा आहे. मोहिते पाटील यांनीही माढ्यातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला येते आणि तिकिट कोणाला दिले जाते, यावर बोलणे उपमुख्यमंत्र्यांनी टाळले आहे.

लोकसभा आचारसंहितेबाबत भाष्य

आगामी लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पुढील महिन्यात मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. मी तसा दावा करत नाही. तशी चर्चा सुरू आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT