Madha Politics : माढा लोकसभा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; धैर्यशील मोहिते पाटलांनी फोडला सुतळी बाॅम्ब...

Ranjeetsingh Nimbalkar on Dhairyasheel Mohite Patil : माढ्याचा तिढा : लोकसभेसाठी मोहिते पाटलांनी घातला खोडा
 Ranjeetsingh Nimbalkar on Dhairyasheel Mohite Patil
Ranjeetsingh Nimbalkar on Dhairyasheel Mohite PatilSarakarnama
Published on
Updated on

Solapur News : 'गेली साडेतीन वर्षे आपण पक्षाचे काम केलेले असून, माढा लोकसभा मतदारसंघातून आपण भाजपकडून इच्छुक आहोत. कार्यकर्ते आपल्या उमेदवारीसाठी ऐकण्याच्या पलीकडे आग्रही आहेत', ऐन दिवाळीतच असा सुतळी बॉम्ब धैर्यशील मोहिते पाटील यांनी फोडला आहे. गेल्या चार वर्षांत मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात ठासलेल्या राजकीय वितुष्टाची दारू आता निवडणुकीच्या तोंडावर विस्फोटाच्या पातळीवर आलेली आहे. त्यामुळे एकूणच माढा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसत आहे.

२०१९ मध्ये सभा निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सर्व कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना अतिशय चुरशीच्या लढतीत निवडूनही आणले. एकट्या माळशिरस तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य देऊ, असा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दिलेल्या शब्द, मोहिते पाटलांनी सव्वा लाखाचे मताधिक्य देत पूर्णही केला होता. मोहिते पाटील व रणजितसिंह निंबाळकर यांच्यात गेल्या चार वर्षांत राजकीय वितुष्ट आले असून, आता कोणत्याही परिस्थितीत मोहिते पाटील निंबाळकर यांना स्वीकारणार नाहीत, असे दिसत आहे.

 Ranjeetsingh Nimbalkar on Dhairyasheel Mohite Patil
Sharad Pawar Rally News : ...तर शरद पवार यांच्या सभेच्या आजूबाजूचे रस्ते बंद करा!

2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मोहिते पाटलांच्या रूपाने भाजपला मजबूत नेतृत्व सापडले होते. परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सहा ते आठ महिन्यांतच निंबाळकर यांचे मोहिते पाटलांची मतभेद वाढीस लागले. माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते विरोधकांना निंबाळकर ताकद देऊ लागले. निंबाळकर मंचावर असताना त्यांच्या समक्ष मोहिते पाटील विरोधक जहरी टीका करू लागले. कट्टर मोहिते पाटील विरोधक आमदार संजय शिंदे, आमदार बबनदादा शिंदे यांच्याशी निंबाळकर यांचे गूळपीठ जमू लागले होते. सांगोला तालुक्यातील मोहिते पाटील विरोधक आमदार शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे, श्रीकांत देशमुख आदी नेत्यांना हाताशी धरून खासदार निंबाळकर यांनी त्या तालुक्यातही आपला स्वतःचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

विकसनशील कामे

माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा या तालुक्यांतील कोणतेही प्रश्न मोहिते पाटलांना न विचारता निंबाळकर सोडवू लागले. माढा मतदारसंघातील फलटण - पंढरपूर रेल्वेचा प्रश्न असो नीरा-देवघर धरण, नीरा उजवा कालवा, कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजना असो, त्यासाठी खासदार निंबाळकर यांनी स्वतःच्या पातळीवर प्रयत्न सुरू केले. मोहिते पाटील यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. एवढेच नाही तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार प्रसंगी रणजितसिंह निंबाळकर यांनी दिल्लीत स्वतंत्रपणे खासदाराचे लॉबिंग करण्याचाही प्रयत्न केला.

एकूणच आक्रमक कार्यशैली असलेल्या निंबाळकर यांचे शांत व संयमी राहून राजकीय डाव टाकणाऱ्या मोहिते पाटलांशी जमने अशक्य झाले होते. निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत मोहिते पाटील विरोधकांना राजकीय बळ देण्याचा प्रयत्न केला. मागील चार वर्षांत खासदार निंबाळकर हे खूप कमी वेळा अकलूजकडे गेलेले आहेत. या उलट पारंपरिक मोहिते विरोधक असलेल्या माळशिरस, नातेपुते, पिलीव, वेळापूर या दक्षिण पश्चिम भागात निंबाळकर सातत्याने संपर्क ठेऊन आहेत. त्यांनी आपले राजकीय दौरे सातत्याने सुरू ठेवले, मोहिते पाटील विरोधी राजकीय काम करत असल्यामुळे पाटलांनी भाजपच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रारही केली. निंबाळकर यांचे राजकीय काड्या करण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. मागील दोन महिन्यांपासून निंबळकरांनी मोहिते पाटलांना थेटपणे विरोध करण्यास सुरुवात केली असून, पारंपरिक मोहिते विरोधक संजय शिंदे व बबनदादा शिंदे यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन माढा लोकसभेची आपली उमेदवारी निश्चित असल्याची घोषणा केली आहे. शिवाय पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचा प्रचार सर्वांना करावाच लागेल, असा सूचक इशारासुद्धा निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना दिला आहे.

निंबाळकर आणि मोहिते - पाटलात राजकीय वितुष्ट ?

गेल्या चार वर्षांपासून निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वितुष्ट सातत्याने वाढत गेले. मोहिते पाटील हे कधीही राजकीय विरोधकांना जाहीरपणे आव्हान - प्रतिआव्हान देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. वेळ आल्यानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक तोंडावर येतात, पाटलांनी आपली राजकीय शस्त्रं बाहेर काढली आहेत.

 Ranjeetsingh Nimbalkar on Dhairyasheel Mohite Patil
Manoj Jarange Patil News : ‘येवलेकरांनो सावध राहा, येणारा काळ कसोटीचा’

रणजितसिंह पाटलांचा दांडगा जनसंपर्क

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मागील तीन वर्षांत संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील आपला संपर्क कायम ठेवला आहे. सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत मोहिते पाटलांनी आपल्या विकासकामांचा प्रयत्न चालूच ठेवला असून, निंबाळकर यांना बाजूला ठेवत पुढच्या निवडणुकीत जावे लागणार आहे, असा सूचक संदेश मोहिते पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मागील दोन वर्षांत दिला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक सचिव आहेत. त्यांनी मागच्या एक वर्षभरापासून माढा मतदारसंघातील आपला संपर्क वाढवला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी एक वर्षापासून सुरू केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर दिवाळीत आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा सुतळी बॉम्ब फोडला आहे. या बॉम्बच्या वाचाने भाजपच्या पक्षश्रेष्ठींची कान उघडले, तरच यावर काही तोडगा निघू शकतो, अन्यथा मोहिते पाटील ज्या पद्धतीने चॅलेंज देऊन निंबाळकर यांना लोकसभेत पाठवले, त्याच पद्धतीने उघड आव्हान देऊन निंबाळकरांना घरचा रस्ता ही दाखवू शकतात, असे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे.

 Ranjeetsingh Nimbalkar on Dhairyasheel Mohite Patil
Manoj Jarange Patil News : जरांगे पाटील यांना वाटतेय एकच भीती...म्हणाले सावध राहा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com