Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Baramati Sabha : सतरा वर्षांत आता तुम्हाला चहाचा गाडा आठवला का? अजितदादांचा रोख कुणाकडे?

Vijaykumar Dudhale

Baramati News : आता काही जण रात्री दहा वाजता गाड्यावर येऊन चहा पीत असतात. यांना १७ वर्षांनंतर आता चहा पिण्याचे आठवलं का? मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालवणं बरं, की बारामती आणि महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता वेळ देणं बरं. आपल्याला काम करायचं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केली. त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली हेाती. (Loksabha Election 2024)

बारामती येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. ते म्हणाले की, जे काम करतात, त्यांच्यावर आरोप हेातात. तुम्ही कधी मंत्रीच झाला नाही, तर तुमच्यावर आरोप कसे होणार. जो काम करतो, तोच चुकतो. (Ajit Pawar Sabha)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता काही जण रात्री दहा वाजता गाड्यावर येऊन चहा पीत असतात. यांना १७ वर्षांनंतर आता चहा पिण्याचे आठवलं का? मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालवणं बरं, की बारामती आणि महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता वेळ घालवणं बरं. आपल्याला काम करायचं आहे. काही जण भावनिक होतील, कोणी काही सांगतील. माझ्या बोलण्याचा काहींनी चुकीचा अर्थ काढला. माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घेतला पाहिजे, असेही अजित पवार यांनी नमूद केले. (Baramati Loksabha)

उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आज काम करत आहोत. वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले असते, तर आम्ही चांगले अन्‌ आम्ही अध्यक्ष झालो तर निव्वळ बेकार...यांनी पक्ष चोरला, असं सांगितलं जातं. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला पक्ष दिला आहे. आम्ही पक्षासाठी काय केले, हे विसरून जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी माझी चांगली ओळख झाली आहे. पूर्वी आमची ओळख व्हायची नाही. आम्ही मागं राहायचो. कारण वरिष्ठांना मान दिला पाहिजे ना. पण, आता मोदी-शाह हे आपल्याला नावाने ओळखत आहेत, असेही पवार यांनी नमूद केले.

येत्या दोन मार्च रोजी रोजगार मेळावा

येत्या दोन मार्च रोजी बारामती येथे नवरोजगार मेळावा आयोजित केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी तो रोजगार मेळावा असणार आहे. या रोजगार मेळाव्यात नऊ कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सहा ठिकाणी असे नवरोजगार मेळावे होणार आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT