Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांना केंद्रात प्रमोशन; राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदाची धुरा दिली हाती...

National Sugar Association : राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद देऊन भाजपने माजी मंत्री पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : माजी सहकारमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह यांच्या ‘गुडबुक’मध्ये असलेल्या पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (BJP Leader Harshvardhan Patil)

या निवडीबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. तसेच, ते आज दुपारी शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या निवडीमुळे हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा आले आहेत. (National Sugar Association)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Patil
Shiv Sena Convention : बाळासाहेबांची परंपरा पुन्हा सुरू करत शिंदे गट कोल्हापुरातून फुंकणार लोकसभेसाठी रणशिंग

राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आल्यानंतर संघाचे उपाध्यक्षपद हे गुजरातकडे देण्यात आले आहे. केतनभाई पटेल यांचीही त्या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही निवडी महत्त्वपूर्ण ठरतात.

दरम्यान, राष्ट्रीय सहकार साखर संघावर गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघाची सत्ता भाजपकडे येताच संघाच्या अध्यक्षपदाची धुरा महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. साखर संघाचे अध्यक्षपद देऊन भाजपने माजी मंत्री पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकार साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच, तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखानाही त्यांच्या ताब्यात आहे. याशिवाय खासगी साखर कारखाना चालवण्याचाही अनुभव पाटील यांच्या पाठीशी आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त हेात आहे.

Harshvardhan Patil
Gaon Chalo Abhiyan : गावकऱ्यांसोबत पंगतीत जेवण अन्‌ कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम; आमदार सातपुते रमले फडतरीत

राज्यसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत होते. पाटील हे 2019 पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांना विधान परिषद अथवा राज्यसभेवर पाठविले जाईल, अशी चर्चा हाेती. मात्र, राज्यसभेची संधी हुकल्यानंतर भाजपने त्यांना तातडीने राष्ट्रीय सहकार साखर संघावर संधी दिली आहे. त्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.

R

Harshvardhan Patil
Baramati Loksabha : सुनेत्रा पवारांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; भाजप आमदार राहुल कुल यांची घेतली भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com