Eknath shinde
Eknath shindeSarkarnama

Shiv Sena Convention : बाळासाहेबांची परंपरा पुन्हा सुरू करत शिंदे गट कोल्हापुरातून फुंकणार लोकसभेसाठी रणशिंग

Loksabha Election-2024 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यसह देशभरातून आलेल्या शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत.
Published on

Kolhapur News : फुटीनंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात माळ पडल्यानंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आली. हिंदुहृदय सम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसेनेच्या कोल्हापूर अधिवेशनात खंड पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ती परंपरा पुन्हा एकदा सुरु केली आहे. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी अधिवेशनात पुन्हा एकदा पावले उचलली जाणार आहेत. (Shinde group will break the coconut of Lok Sabha campaign from Kolhapur)

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यसह देशभरातून आलेल्या शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. कुमकवत ठिकाणी संघटनात्मक बांधणी, पक्ष वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिवेशनातील भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Shiv Sena Convention)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath shinde
Shivsena Convention : कोल्हापुरात लागले तीन हजार बॅनर्स, राजेश क्षीरसागरांनी साधला अधिवेशनाचा मुहूर्त

राज्यासह देशभरातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना अधिवेशनाचे पासेस देण्यात आले आहेत. त्या पासवर आगामी लोकसभा निवडणुकीचे व्हिजन स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘मिशन-48’ आणि ‘लोकसभा-2024’ हे हॅश टॅग देण्यात आले आहेत.

या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचण्यासाठी काही महत्वाचा मंत्र दिला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती, सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

Eknath shinde
Gaon Chalo Abhiyan : गावकऱ्यांसोबत पंगतीत जेवण अन्‌ कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम; आमदार सातपुते रमले फडतरीत

सुरुवातीला या महाअधिवेशनासाठी यायला लागतंय अशी टॅगलाईन देण्यात आली होती. त्याचबरोबर शिवसैनिकांना प्रेरित करण्यासाठी ‘आज, उद्या, कधीही बाळासाहेबांच्या विचारांनी’ असा मंत्र पदाधिकाऱ्यांना दिला आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आज शिंदे गटाचा लोकसभा प्रचाराचा पहिला नारळ फुटण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

Eknath shinde
Baramati Loksabha : सुनेत्रा पवारांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; भाजप आमदार राहुल कुल यांची घेतली भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com