Patna, 07 February : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहार पोलिस दलातील दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले शिवदीप लांडे हे नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहेत. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीपदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर लांडे यांनी फेसबुक पोस्ट करत ‘कथेचा एक अंक पूर्ण, दुसऱ्याची सुरुवात ....’ असे सांगून नव्या इनिंगबाबत संकेत दिले आहेत. शिवदीप लांडे हे बिहारच्या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक ते बिहारमधून लढण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, दबंग पोलिस अधिकारी शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील माजी मंत्री तथा शिवसेना पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचे जावई आहेत, त्यामुळे सासऱ्यापाठोपाठ जावईही राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. लांडे यांनी पोलिस दलातील सेवेचा दिलेला राजीनामा त्याचेच द्योतक मानले जात आहे.
शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्या वर्दीचा फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्यांनी भविष्यातील वाटचालीबाबतही सूचक भाष्य केले आहे. लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तो सुगंध हवेत मिसळणार’. वर्दी हे तरुण मनाचे स्वप्न आहे, पण अशी सातत्य सेवा झाल्यानंतर कातडी एकसमान होते, जनतेशी जोडण्याची गरज नाही. नोकरीच्या पुढे चला, बिहारच्या ‘अबो हवा’ला भेटण्याची वेळ आली आहे. कथेचा एक अंक पूर्ण, दुसऱ्याची सुरुवात....
शिवदीप लांडे हे आपल्या दबंग कामगिरीमुळे बिहारमध्ये (Bihar) विशेष लोकप्रिय आहेत. आतापर्यंत त्यांनी मोठमोठी ऑपरेशन सहजरित्या पूर्ण केली आहे, त्यामुळे बिहारमधील जनताही त्यांची दिवानी आहे. शिवदीप लांडे यांनाही बिहारविषयी विशेष आवड आहे. त्यामुळेच बिहार आणि शिवदीप लांडे एक प्रकारचे समीकरण बनले आहे
दरम्यान, शिवदीप लांडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे २९ जानेवारी रोजी फेसबुक पोस्ट केली होती, त्या पोस्टमध्ये त्यांनी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे, असे म्हटले होते, त्यामुळे लांडे हे बिहारच्या राजकारणात उतरणार, अशी चर्चा रंगली होती. आताची त्यांची फेसबुक पोस्टही तेच दर्शवित आहे.
येत्या डिसेंबरअखेर बिहार विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवदीप लांडे यांनी दिलेला पोलिस दलातील राजीनामा हा विशेष चर्चेत आहे. ते विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वसामान्य जनतेशी जोडण्यासाठी वर्दीची गरज नाही, असे सांगून त्यांनी राजकीय इनिंगचे संकेत दिल्याचे मानले जात आहे, त्यामुळे शिवदीप लांडे हे बिहारच्या राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.