Shridevi Fulare  Sarkarnama
विशेष

Solapur Lok Sabha 2024 : ‘गोल्डन नगरसेविके’ने फाटकी साडी नेसून भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज!

Shridevi Fulare News : श्रीदेवी फुलारी यांनी 2007 मध्ये शिवसेनेकडून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवून विजयी झाल्या.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 April : सोलापूर शहरात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी आज (ता. १६ एप्रिल) सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. एरव्ही अंगावर १२५ तोळे सोनं घालून मिरवणाऱ्या फुलारे यांनी आज चक्क फाटकी साडी नेसून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे फुलारे यांच्या फाटक्या साडीची सर्वत्र चर्चा होत आहे.

श्रीदेवी फुलारे यांनी 2007 मध्ये शिवसेनेकडून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावर लढवून विजयी झाल्या. काँग्रेसकडून निवडून आलेल्या श्रीदेवी फुलारे (Shridevi Fulare ) मागील काही वर्षांपासून मात्र पक्षापासून अंतर राखून आहेत. त्यांनी वंचित आणि सकल मराठा समाजाकडे सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित बहुजन आघाडीने अक्कलकोटचे राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली, तर सकल मराठा समाजाने लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फुलारे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक (Lok sabha Election) लढवायचीच, यावर ठाम असलेल्या फुलारे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

श्रीदेवी फुलारे यांची सोलापूरमध्ये ‘गोल्डन नगरसेविका’ अशी ओळख आहे. महापालिकेत काम करताना त्या अगदी भलेमोठे गंठण, मोठमोठ्या अंगठ्या, पाटल्या घालून दैनंदिन कामकाजात सहभागी व्हायच्या. त्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात आणि शहरात त्यांना ‘गोल्डन नगरसेविका’ म्हणून ओळखले जायचे.

‘गोल्डन नगरसेविका’ श्रीदेवी फुलारे या आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना मात्र अंगावर दागिने न घालता फाटकी साडी नेसून आल्या होत्या. त्यांचं हे नवं रूप पाहून अनेकजण अचंबित झाले. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला.

फाटकी साडी नेसून अर्ज भरण्याच्या त्यांच्या क्लृप्तीबाबत श्रीदेवी फुलारे म्हणाल्या, भाजप आणि काँग्रेसच्या लोकांनी सोलापूर शहराकडे कायम दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे शहराची अवस्था अशी फाटकी झाली आहे. त्यामुळे सोलापूरचे फाटके रूप दाखवण्यासाठी मी ही साडी नेसून आले आहे. राजकीय पक्षांनी स्थानिकांना संधी न देता बाहेरचे उमेदवार दिले आहेत. सुशीलकुमार शिंदे हे मूळचे धाराशिवचे आहेत, तर राम सातपुते हे बीडचे आहेत. यापूर्वीच्या खासदारांनी कोणतेही काम केलेले नाही.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT