Baramati Lok Saba 2024 : शरद पवारांचा इंदापुरात नवा डाव; हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Indapur Politics : कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हे स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत. त्याच कारखान्याचे भरत शहा उपाध्यक्ष आहेत. तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखानाही हर्षवर्धन पाटील यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे आज पवारांच्या पक्षात जात आहेत, त्यामुळे ही पक्षांतराची चर्चा चांगलीच रंगली आहे.
sharad pawar-Bharat Shah-Appasaheb Jagdale
sharad pawar-Bharat Shah-Appasaheb JagdaleSarkarnama

Indapur, 16 April : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठा डाव टाकला आहे. माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे एकेकाळच्या अत्यंत निकटवर्तीयांना आपल्या गोटात खेचण्यात पवारांना यश आले आहे.

पाटील यांचे मामा तथा पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे हे आज (ता. 16 एप्रिल) पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना धक्का मानला जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा इंदापूरच्या (Indapur) दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इंदापूर दौऱ्यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

त्यामुळे पवारांना इंदापूरमध्ये धक्का बसला होता. पवारांचे निकटवर्तीय असलेल्या दशरथ माने यांनी साथ सोडल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली होती. त्याला आठवडा उलटत नाही तोच पवारांनी भाजपला आणि अजितदादांना चोख उत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sharad pawar-Bharat Shah-Appasaheb Jagdale
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर, शरद पवारांच्या मल्लाशी भिडणार

पुणे जिल्हा बँकेचे संचालक, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा आहेत.

तसेच, इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटील यांचा गट म्हणून ओळख असलेले इंदापूर अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष तथा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा (Bharat Shah), नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे (Kantilal Zagde) यांच्यासह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. मध्यंतरी काळात जगदाळे आणि शहा यांच्यासोबत पाटील यांचे मतभेद झाले होते. मात्र, त्यांची ओळख पाटील यांचे निकटवर्तीय अशीच मानली जाते.

कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हे स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत. त्याच कारखान्याचे भरत शहा उपाध्यक्ष आहेत. तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखाना हाही हर्षवर्धन पाटील यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे आज पवारांच्या पक्षात जात आहेत, त्यामुळे ही पक्षांतराची चर्चा चांगलीच रंगली आहे.

sharad pawar-Bharat Shah-Appasaheb Jagdale
Sharad Pawar Solapur Tour : माेहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला येणाऱ्या शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द

या मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे इंदापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी चार वाजता पक्षप्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमात शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याबाबत पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. पक्षात आलेल्या सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल.

R

sharad pawar-Bharat Shah-Appasaheb Jagdale
Solapur Lok Sabha : ‘तुमचा कार्यक्रम करणं फार अवघड नाही’; भालके समर्थकांचा शिंदेंना खणखणीत इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com