Solapur, Madha Lok Sabha : महायुतीचे राम सातपुते अन् निंबाळकरांचे शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

Loksabha Election 2024 : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयाची संकल्प यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेसाठी फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले आहेत.
Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Ram Satpute-Ranjitshinh Naik NimbalkarSarkarnama

Solapur, 16 April : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रॅली काढून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.

सोलापूर शहरातील संभाजी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. सजवलेल्या टेंपोत माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar), सोलापूरचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सहभागी होते. एरव्ही एकमेकांवर तुटून पडणारे मोहोळचे हे दोन नेते आज दोन्ही उमेदवाराच्या आजूबाजूला उभे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Baramati Lok Saba 2024 : शरद पवारांचा इंदापुरात नवा डाव; हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Solapur Lok Sabha Constituency) राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज (ता. १६ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार राजन पाटील, आमदार सुभाष देशमुख व भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत आमदार बबनराव शिंदे, शहाजी पाटील, संजय शिंदे आणि जयकुमार गोरे होते.

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक लक्षवेधी लढत मानली जात आहे. दुसरीकडे मोहिते पाटील यांच्या बंडामुळे माढा मतदारसंघ संपूर्ण राज्यभर चर्चिला गेला आहे.

Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदे प्रचाराला गेले अन् मायावतींचे दोन आमदार पक्षात घेऊन आले!

माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापुढे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील यांचे आव्हान असणार आहे. त्यामुहे माढ्याच्या लढतीकडे राज्याबरोबरच देशाचेही लक्ष असणार आहे. कारण, माढ्याचे नेतृत्व शरद पवार यांनी केलेले आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांची विजयी संकल्प रॅली काढण्यात येत आहे. या विजयी संकल्प रॅलीसाठी फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले आहेत. या विजयी संकल्प रॅलीत दोन्ही उमेदवारांसह फडणवीस, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजी पाटील, सचिन कल्याणशेट्टी, जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटील हे प्रामुख्याने सहभागी झाले आहेत.

R

Ram Satpute-Ranjitshinh Naik Nimbalkar
Sharad Pawar Solapur Tour : माेहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला येणाऱ्या शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com