Prithviraj Chavan Sarkarnama
विशेष

Madhya Pradesh Election Result : अनपेक्षित...धक्कादायक... : पृथ्वीराज चव्हाण मध्य प्रदेशातील पराभवामुळे उद्‌विग्न

Prithviraj Chavan On MP's Defeat : मध्य प्रदेशच्या जनतेने दिलेला हा कौल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वीकारला आहे.

Vijaykumar Dudhale

Bhopal News : मध्य प्रदेशात काँग्रेसला भाजपकडून मोठी हार पत्कारावी लागली आहे. काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये विजय मिळेल, अशी आशा असताना पराभव पदरी पडल्याने पक्षाचे नेते नाराज झाले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तशीच प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेशातील पराभव हा अनपेक्षित... धक्कादायक आहे, यात कुठलही शंका नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (Prithviraj Chavan's reaction to Congress defeat in Madhya Pradesh)

ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे निरीक्षक म्हणून भोपाळ गेले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्कादायकपणे पराभावाला सामोरे जावे लागल्याने पक्षाच्या नेत्यांमधील नाराजी उघडपणे दिसत आहे. त्यातून चव्हाण यांनी उद्‌विग्न होत ही प्रतिक्रिया दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशच्या जनतेने दिलेला हा कौल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वीकारला आहे. मध्य प्रदेशातील पराभावाचे आत्मपरीक्षण तर निश्चितपणेच करावं लागणार आहे. या पराभवाचे विश्लेषण केल्याशिवाय त्यावर जास्त बोलणे योग्य होणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशातील पराभवाबाबत सांगितले की, काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील पराभवाचं एवढ्या तडकाफडकी विश्लेषण करणं योग्य होणार नाही. आम्ही सर्व विजयी आणि पराभूत उमेदवारांना भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर शांतपणे या पराभवाचे विश्लेषण नक्की करू. तेलंगणामध्ये विजय झाला आहे. पण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला पराभव हा धक्कादायक आहे.

राजस्थानमधील विजयाबाबत थोडी शंका होतीच. कारण त्या ठिकाणी प्रत्येक पाच वर्षांनी बदल होतो. पण, मध्य प्रदेशमध्ये का बदल झाला नाही, हे समजत नाही. या पराभवाचे नक्कीच विश्लेषण होईल. लोकसभा निवडणुकीच्या अनुंषगाने या पराभावाचे काँग्रेस पक्षाकडून नक्की विश्लेषण केले जाईल आणि त्यानुसार पुन्हा कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT