Manohar Joshi Sarkarnama
विशेष

Manohar Joshi News : ...अन् जोशी सरांनी शेकडो कार्यकर्त्यांना दिलं हक्काचं छप्पर!

Sampat Devgire

Manohar Joshi Death News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निष्ठावंतांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. यातील अनेक निष्ठावंत घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेसाठी लढत असत. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी ( Manohar Joshi ) यांनी एक निर्णय घेतला होता. त्यामुळे शेकडो निष्ठवंतांना मुंबईत आणि राज्यभरात हक्काचं छप्पर मिळालं. ( Former Cm Manohar Joshi Passes Away )

शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून परिचित असलेले आणि शिवसेनाप्रमुखांचे विश्वासू सहकारी मनोहर जोशी हे कार्यकर्त्यांमध्येदेखील तेवढेच लोकप्रिय होते. अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे कामे घेऊन जात असत. विशेष म्हणजे जोशी सरांकडे फक्त शिवसैनिक नव्हे, तर अन्य क्षेत्रातील कार्यकर्तेदेखील हक्काने जाऊ शकत होते. त्यामुळे फाटक्या कार्यकर्त्यांच्या काही समस्या जोशी सरांनी समजून घेतल्या होत्या. या समस्यांना त्यांनी उत्तर शोधले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री असताना नागरिक कमाल जमीन धारणा कायदा (यूएलसी) हा एक अतिशय मोठा आणि चर्चेचा विषय होता. या योजनेअंतर्गत शासनाच्या गृहनिर्माण विभागाला अतिरिक्त जमिनीवर झालेल्या बांधकामांतून दहा टक्के सदनिका वितरित करण्याचा स्वेच्छा अधिकार मुख्यमंत्र्यांना होता.

या अधिकाराचा पुरेपूर उपयोग कोणी केला असेल तर ते होते जोशी सर. त्याचे कारण म्हणजे ते आधी असलेल्या काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री या अधिकाराचा फक्त राजकीय हेतूने वापर करीत असत. त्यामुळे सामान्यांना त्याचा लाभ मिळविणे जवळपास अशक्य वाटायचे. त्याला शिवसेना (Shivsena) अपवाद ठरली.

चंद्रकांत खैरे हे गृहनिर्माणमंत्री आणि अजित भरती हे त्या खात्याचे प्रधान सचिव होते. त्यांनी राज्याच्या विविध विभागीय ठिकाणी जाऊन म्हाडाची घरे आणि दहा टक्के स्वेच्छा घरांचा आढावा त्यांनी घेतला होता.

महाराष्ट्राच्या दौऱ्यात जोशी सरांकडे जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते, जुने निष्ठावंत यांना हेरून.. हेरून स्वतः मुख्यमंत्र्यांनी यादी तयार केली होती. पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांना मनोहर जोशी सरांच्या एका निर्णयाने हक्काचे छप्पर मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के घरच्या योजनेचे सर्वाधिक निर्णय मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणी 1999 मध्ये झाले होते. त्यामुळे गोरगरीब तसेच कलावंत आणि पत्रकारांना हक्काचे छप्पर देणाऱ्या मुख्यमंत्री अशी जोशी सर यांची एक प्रतिमा होती.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT