Ranjitshinh Mohite Patil
Ranjitshinh Mohite Patil Sarkarnama
विशेष

Mohite Patil News : रणजितसिंह मोहिते पाटलांचे मन भाजपतून अजूनही निघेना...सशक्त भाजप म्हणत दिल्या शुभेच्छा!

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 April : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावल्यामुळे मोहिते पाटील कुटुंबीयांमध्ये भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे. खुद्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील नाराज आहेत, कार्यकर्त्यांकडूनही भाजप सोडण्याबाबत दबाव वाढत आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी तर शरद पवारांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र भाजपविषयी तेवढेच ममत्व दाखवले आहे. स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देताना ‘सशक्त भाजप’ असा उल्लेख केल्याने मोहिते पाटील खरंच माढ्यातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपने माढ्यातून उमेदवारी न दिल्यामुळे मोहिते पाटील कुटुंबीयांनी उघडपणे नाराजीची भूमिका मांडली आहे. धैर्यशील माहिते पाटील हे माढ्यातून भाजपच्या तिकिटासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जोमाने प्रचाराला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे ‘शिवरत्न’वर आले होते. त्यावेळी महाजन यांना मोहिते पाटील समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तिकिट बदलासाठी समर्थकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली होती. तिकिट बदलण्याची घोषणा आताच करावी, असा आग्रह मोहिते पाटील समर्थकांनी महाजन यांच्याकडे धरला होता. तसेच, त्यांची गाडीही अडविण्यात आली होती.

एकीकडे समर्थकांकडून तुतारीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी दबाव वाढत असताना मोहिते पाटील यांच्या घरातही फूट पडल्याचे दिसून येते. जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारीवर धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून लढणार असल्याची घोषणा करून टाकली. रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे माघार घेत आहेत. त्यांना आम्ही थोडे दिवस घरी येऊ नका, असेही सांगितले असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे भाजप (BJP) सोडण्याबाबत मोहिते पाटील कुटुंबीयांमध्ये एकमत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अजूनही मोहिते पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही.

कुटुंबीयांकडून एकीकडे भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत आग्रह होत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मन अजूनही भाजपमध्ये गुंतल्याचे दिसून येते. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सशक्त भाजप....म्हणत सुराज्य, सुशासन, विश्वास, संघटन, कार्यकर्ता ही ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT