Solapur Lok Sabha Constituency : भाजपला धक्का; फडणवीसांचे निकटवर्तीय संजय क्षीरसागरांना यशवंत सेनेची उमेदवारी

Sanjay Kshirsagar News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोहोळचे भारतीय जनता पक्षाचे संजय क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भाजपचे राम सातपुते, वंचितचे राहुल गायकवाड, यशवंत सेनेचे संजय क्षीरसागर आणि एमआयएमकडून रमेश कदम संभाव्य उमेदवार असू शकतात.
Sanjay Kshirsagar
Sanjay KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Solapur,07 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला धक्का बसला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सेनेकडून ते सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. यशवंत सेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून संजय क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विविध आंदोलने, उपोषण करूनही धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नसल्याने समाजाने आता लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात सोलापूर, माढा, रावेर, नगर, धुळे आणि कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Kshirsagar
Jalgaon Politics : सुनेविरोधात प्रचाराला नकार देणारे खडसे मुलीच्या विरोधात प्रचार करतील का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency ) मोहोळचे भारतीय जनता पक्षाचे संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, भाजपचे राम सातपुते, वंचितचे राहुल गायकवाड, यशवंत सेनेचे संजय क्षीरसागर आणि एमआयएमकडून रमेश कदम संभाव्य उमेदवार असू शकतात.

संजय क्षीरसागर हे मोहोळमधील भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रमुख नेते आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना मोहोळमध्ये ओळखले जाते. क्षीरसागर यांनी मागील २०१४ ची विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली होती. त्या निवडणुकीत क्षीरसागर यांना जवळपास ५४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे त्यांना २०२४ मध्ये मोहोळमधून पुन्हा तिकिट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने हे महायुतीत सोबत आल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे.

Sanjay Kshirsagar
Dhule Lok Sabha Constituency : धुळ्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले होणार लोकसभेचे उमेदवार!

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती, त्यावेळी त्या चर्चेत संजय क्षीरसागर हे महत्वाची भूमिका बजावत होते. फडणवीसांचा निरोप हा संजय क्षीरसागर यांच्या माध्यमातून पाटील यांच्याकडे जायचा. त्यामुळे भाजपच्या संजय क्षीरसागर यांची उमेदवारी नेमकी कुणाला फायदेशीर ठरणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

Sanjay Kshirsagar
Lok Sabha Election 2024 : माढ्यात राजकीय हालचालींना वेग; शहाजीबापूंना घाम फोडणाऱ्या डॉ. अनिकेत देशमुखांनी घेतली पवारांची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com