BJP  Sarkarnama
विशेष

Madhya Pradesh Assembly Result : मध्य प्रदेशच्या निकालाबाबत शिवसेना नेत्याने व्यक्त केला संशय; पुराव्यासाठी पोस्टल मतदानाचा ट्रेंडच सांगितला...

Sanjay Raut Allegation : जेव्हा ईव्हीएम मशीन उघडण्यात आलं, तेव्हा वेगळा ट्रेंड दिसून आला.

Vijaykumar Dudhale

Solapur News : मध्य प्रदेशातील पोस्टल मतदानामध्ये दीडशे मतदारसंघात काँग्रेसला लीड मिळालं आहे. पण, ईव्हीएमचा ट्रेंड वेगळा दिसून आला आहे. या देशातील कुठलीही एक निवडणूक जी भाजपशासित राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला दिले. (Shiv Sena leader expressed doubts about Madhya Pradesh result)

सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून पुन्हा एका निशाणा साधाला. ते म्हणाले की, मध्य प्रदेशमधील निकालाचे सर्वांना आर्श्चय वाटत आहे. मोदी-शहा यांची एवढी मोठी लाट कुणालाही कशी दिसली नाही. मध्य प्रदेशात भाजपचं सरकार पुन्हा येईल, असं कोणालाही वाटत नव्हतं. पण, मोदी-शहा यांचं सरकार मध्य प्रदेशात आलं.

मध्य प्रदेशातील दीडशेपेक्षा जास्त मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली. ते बॅलेट पेपरवर घेण्यात आले. त्याला आम्ही ट्रेंड म्हणतो. पण, जेव्हा ईव्हीएम मशीन उघडण्यात आलं, तेव्हा वेगळा ट्रेंड दिसून आला. बॅलेट पेपरवरील ट्रेंड वेगळा असून ईव्हीएमचा निकाल वेगळा आहे, हे आम्ही वारंवार सांगितले आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत म्हणाले की, ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकतो, हे भाजपचे किरीट सोमय्या आणि सुब्रम्हण्यम स्वामी यांनी शोध लावला आहे. त्यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, जगभरातील ईव्हीएम हद्दपार झाले आहेत. केवळ भारतात आहेत, असे वारंवार सांगितले होते. बांगलादेशातही ईव्हीएम निवडणूक घेणे बंद झाले आहे. विरोधी पक्षाची भूमिका मान्य करण्यात आली आहे. बांगलादेशला ईव्हीएम पुरविणारे आपण होतो.

भाजप सोडून सर्व पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी २७ वेळा केली आहे. जोपर्यंत मोदी शहा आहे, तोपर्यंत लोकशाहीसंदर्भात केलेली कुठलीही मागणी मान्य होणार नाही. हा निर्णय सर्वोच्च न्ययालयाने नव्हे; तर निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे. जो निवडणूक आयोग बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदे नावाच्या ऐऱ्यागैऱ्याच्या हाती देतो, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलेले शरद पवार समोर बसलेले असतानाही निवडणूक आयोग राष्ट्रवादी हा पवारांचा पक्ष आहे की अशी शंका घेतो आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

तीन राज्यांत ज्यांनी यश मिळविले, ते प्रचारासाठी तेलंगणातही गेले होते. केसीआर यांचा पराभव करणे, हे सर्वात मोठा टास्क होता. काँग्रेसपेक्षा बीआरएसचा पराभव करणे मोदी-शहा यांना जमलं नाही. मात्र, राहुल गांधी यांनी केसीआर यांचा पराभव करून दाखवला. भाजपला तर दहा आमदारांचाही टप्पा गाठता आलेला नाही. राजस्थानात प्रत्येक पाच वर्षाला सरकार बदलते, असा दावाही राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले की, सर्व घटनात्मक संस्थांवर म्हणजे राज्यपाल, न्यायालय, निवडणूक आयोग यांच्यावर सरकारचा दबाव आहे. मीडियात हुकूमशाही पोसली गेली आहे. फडणवीस म्हणतात की शिल्लक सेना पण २०२४ मध्ये तुम्ही शिल्लक राहणार की नाही, असा आमच्यासमोर प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT