Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde : शिंदेंच्या खात्याकडून दोन दिवसांत 500 कोटींची खैरात... 65 स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत

Government fund approval News : नगरविकास विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामासाठी निधी दिला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. त्यामुळेच सध्या सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे राज्यातील सरकारदेखील सध्या इलेक्शन मोडवर दिसत आहे. त्यामुळेच आगमकी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी पक्षाकडून घोषणा केल्या जात आहेत. महायुती सरकारने महापालिका, नगरपालिकांच्या विकासकामांसाठी गेल्या दोन दिवसांत 500 कोटींचा निधी वितरित केला आहे. नगरविकास विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून दोन दिवसातच 500 कोटींचा निधीचे वाटप करण्यात आले आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामासाठी निधी दिला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील जवळपास 29 महापालिका, 257 नगरपरिषद, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्यांची निवडणूक गेल्या चार वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता निवडणूक आयोग कामाला लागला असून प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता बिवडणूक आयोगाकडून दिवाळीनंतर टप्य्याटप्प्याने निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.

येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीचा फायदा राज्यातील महायुती सरकारला व्हावा या दृष्टीने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखली आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून महापालिका, नगरपालिकांच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप केले जात आहे. सर्वाना सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका, नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. राज्यातील महायुती (Mahayuti ) सरकारने दोन दिवसांमध्ये राज्यभरातील विविध 65 नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका शहर क्षेत्राच्या विकासकामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी वितरित करण्याचे आदेश जारी केले आहेत. सोमवारनंतर पुन्हा काही शहरांसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात येणार असल्याने उत्सुकता लागली आहे.

राज्यातील नगरविकास विभागाचा कारभार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) पाहत आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन मतदाराना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. आगामी काळात गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जवळपास 29 महापालिका, 257 नगरपरिषद, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

या निधी वितरणात मुंबई उपनगरासाठी 36. 62 कोटी, नागपूर जिल्ह्यातील कामठी, महादुला, पिंपळा, बहादुरा या नगरपंचायतींसाठी 40 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, भंडणगड, दापोलीसाठी 19.90 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, वडगाव, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगलेसाठी 16. 6 कोटी, नाशिक उद्योग भवनासाठी 16 कोटी व अन्य कामासाठी13. 75 कोटी असे एकूण 30.36 कोटी 61 लाखांचा निधी दिला आहे.

बदलापूर व मुरबाडसह ठाण्यात 16.90 कोटी, सांगली जिल्ह्यातील 10 नगरपालिकांसाठी 10.5 कोटी, कर्जत, कोपरगावसाठी 2 कोटी, उरण (रायगड) साठी 15 कोटी, देऊळगाव, सिंदखेड (बुलडाणा) 5 कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, बल्लारपूर, पोचुर्णा नगरपंचायतीसाठी 10 कोटी, मलकापूर (सातारा) 20.80 कोटी अशा राज्यातील 65 नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका शहरांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.

राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले आहे. तर येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या कारभारावर सर्वस्थरातून टीका होत आहे. केवळ आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरते निधीचे वाटप न करता कायमस्वरूपी निधी दिला जावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT