Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागला आहे. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी, खिल्ली उडवण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे.
गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक घडामोडी झाल्या. या पाच वर्षात राज्याने तीन बंड पाहिले. तीन मुख्यमंत्री पाहिले. याच काळात आरक्षणासाठी ओबीसी, मराठा, धनगर समाजाने केलेला संघर्षही महाराष्ट्राने पाहिला. त्यासोबतच राज्याच्या राजकारणात अल्पसंख्यांक समाजाच्या मतदाराची संख्या निर्णायकी आहे. त्यामुळे या समाजाचा प्रभाव असलेल्या 35 मतदारसंघात कॊणाचा प्रभाव असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील 288 पैकी 35 जागावर अल्पसंख्यांक समाजाच्या मतदाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात अल्पसंख्यांक समुदायाची मतदाराची संख्या या 35 मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समुदाय कोणाच्या पाठीशी उभे राहणार याकडे लक्ष लागले आहे. या मध्ये 35 जागांवरचा जय-पराजयाचा खेळच येत्या काळात महाराष्ट्रात ठरविणार सत्ता कुणाची? याचा तिढा सोडविणार असल्याने या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील सर्वच मतदारसंघात अठरापगड जाती धर्माचे मतदार विखुरलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात एकाद्या जातीचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्या जातीचे एकगठ्ठा मतदान त्या समाजातील उमेदवारासाठी प्लस पॉईन्ट ठरू शकतो. त्यामुळे राज्यातील काही मतदार संघ हे मुस्लिमबाहूल मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची निर्णायक असलेली मते कोणाच्या बाजूने झुकणार यावरून राज्यात सत्ता कोणाची येणार? हे ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचे या कडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील 35 मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी अल्पसंख्यांक समुदायाचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 11.24 कोटी असून त्यापैकी जवळपास 1.3 कोटीच्या आसपास अल्पसंख्यांक समाज आहे.
राज्यातील 288 विधानसभेच्या जागापैकी काही मतदारसंघात सरासरी अल्पसंख्यांक समाजाच्या मतदाराची संख्या 20% च्या आसपास आहे. त्यापैकी आठ ते नऊ विधानसभा मतदार संघामध्ये अल्पसंख्यांक समाजाची संख्या निर्णायक आहे. मात्र निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुस्लिम उमेदवारांची संख्या अत्यल्प आहे.
राज्यातील प्रमुख पक्षाचा विचार केला तर 13 मुस्लिम चेहऱ्याना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसने (Congress) आठ जणांना रिंगणात उतरवले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाने एक जणांला उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एकाला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने तीन जणांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाज हा विकासाला प्राधान्य देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विविध योजना राबून अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक मंत्रालय होते, परंतु सचिवालय नव्हते. यामुळे मंत्रालयाचा काहीही उपयोग झालेला नव्हता. देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अल्पसंख्यांक समाजासाठी सचिवालय तर मिळालेच त्याशिवाय जिल्हा पातळीवर कार्यालय सुरू झाले आहेत.
यामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही भाजपकडून दिली जात आहे. त्यामुळे हा मुस्लिम समाज आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणाच्या पाठीशी उभा राहणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली आहेत. त्यासोबतच गेल्या पंचवार्षिकमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आहे. त्यामुळे याचा फायदा येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत महायुतीला होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अल्पसंख्याक समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला होता. त्याचा फायदा महाविकास आघडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला झाला होता. राज्यातील 48 पैकी 30 जागावर महाविकास आघाडीने विजय मिळवला होता. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समुदाय हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच असेल असे वाटते. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाज कोणाच्या पारड्यात त्यांचा कौल टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.