Devendra Fadnavis sarkarnama
विश्लेषण

Devendra Fadnavis BJP election strategy : अधिवेशन भाजपचे, केंद्रस्थानी CM देवेंद्र फडणवीस यांची 'सबुरी' अन् 'संयम'

BJP Maharashtra state executive meet : विधानसभा निवडणुकीनंतर शिर्डीत आज भाजपचे महाविजय अधिवेशन होत असून त्याच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत भाजप मोठा पक्ष ठरला. एकट्या भाजपने महायुतीत 132 जागा पटकविल्या. संयमी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला. महायुतीचे सरकार स्थापन केल्यापासून एक हाती नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीत आज भाजपचे महाविजय अधिवेशन होत आहे. विधानसभेतील महाविजयामुळे कालपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकणारे आता त्यांचे गुणगान गात आहेत. विधानसभेतील महाविजयामुळे राज्यातील भाजपबाबतचे सर्व चित्र बदललेले आहे. यातून केंद्रस्थानी आले आहेत, देवेंद्र फडणवीस! हे भाजपच्या महाविजय अधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे. यातूनच 'श्रद्धा, सबुरी अन् भाजपची महाभरारी', ही टॅगलाईन पुढे आली आहे.

शिर्डीमध्ये होत असलेल्या या भाजपच्या महाविजय अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप (BJp) नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भाजपच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. असे असले तरी या महाविजय अधिवेशनाच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत.

टीका करणाऱ्या विरोधकांकडून आता गुणगान

विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीत खालच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गलिच्छ प्रचाराची राळ उडवून देण्यात आली, तरीही देवेंद्र फडणवीस यांनी 'सबुरी' दाखविली. भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचारावर 'श्रध्दा' ठेवली. त्यांची व्यूहरचना आणि झंझावाती प्रचाराचा भाजपच्या महाविजयात महत्त्वाचा वाटा ठरला.

नेतृत्वावर शंका, केंद्रात पाठवण्याचे सल्ले

गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाल पाहिल्यास तो देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी संघर्षाचा होता. महाविकास आघाडीचे सरकार तिथं विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका, त्यानंतर राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील फूट, त्यात महायुती सरकारची वाटचाल, माहिती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून कामकाजाचा अनुभव असून देखील उपमुख्यमंत्री म्हणून सांभाळलेला पदभार. यात देवेंद्र फडणवीस यांची कोडी झाली. विरोधकांबरोबर स्वकियांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस संयमाने सामोरे गेले. यातच भाजपच्या काही नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याचे सल्ले देखील समोर आले.

शिंदे सरकारचा 'तोल' सांभाळला

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाचा आणि सरकारचा तोल देखील फडणवीस यांनी लीलया सांभाळला. लोकसभा निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अचूक विश्लेषण केले आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपर्व यश मिळवून दिले. लाडकी बहीण योजनेसह इतर जातीय समीकरणांवर अचूक काम देवेंद्र फडणवीस यांनी केले याचवेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी देखील संयमाने हाताळली. यात भाजप बहुमताजवळ गेली.

संघटनात्मक बांधणीचं आव्हान

विधानसभेतील या विजयानंतर भाजपचे पहिले महाविजय अधिवेशन शिर्डीत होत आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच केंद्रस्थानी असणार आहेत. आगामी राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपची संघटनात्मक बांधणी यावर काम होणार आहे. यात भाजपची संघटनात्मक बांधणीची दिव्य देवेंद्र फडणवीस यांना साभाळायचे आहे. तिथं देखील फडणवीस यांच्या सबुरीचा आणि संयमाचा कस लागणार आहे. याची फडणवीस यांना पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवसापासूनच शिर्डीत तळ ठोकला आहे.

केंद्रस्थानी सीएम फडणवीसच...

पक्षांमधील खासदार आमदार मंत्री नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यातून त्यांनी आगामी काळात पक्ष संघटनेची बांधणी कशी करायची याचा अंदाज घेतलाच असणार आहे. ज्यावेळेस पक्ष संघटनेचा विस्तार होईल. त्यानंतर त्याचे देखील स्वरूप समोर येईल, असे पक्षातील जुने जाणते नेते आणि पदाधिकारी हे खासगीत सांगत आहेत. या सर्व घडामोडींमुळे देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या महाविजय अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT