devendra fadnavis, dhairyasheel mane, eknath shinde  Sarakarnama
विश्लेषण

BJP vs Eknath Shinde: पंकजाताईंनंतर एकनाथ शिंदेंही जनतेच्या मनातले मुख्यमंत्री; भाजपला सहन होईना, वादाची ठिणगी पडलीच!

Eknath Shinde public support News : भाजपमधील माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व मंत्री गिरीश महाजन यांनी माने यांनी केलेलया या वक्तव्यानंतर त्यांची कानउघाडणी केली. यानिमित्ताने भाजपमधील काही वरिष्ठ नेते मंडळी यावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करीत अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आभार दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात आले असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी मोठे वक्तव्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत, असे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. धैर्यशील माने यांनी केलेल्या या मोठ्या वक्तव्यानंतर आता चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी केलेले हे विधान भाजपला सहन होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

यावरून भाजपमधील माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व मंत्री गिरीश महाजन यांनी माने यांनी केलेलया या वक्तव्यानंतर त्यांची कानउघाडणी केली. यानिमित्ताने भाजपमधील काही वरिष्ठ नेते मंडळी यावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करीत अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

राज्यात 2014 साली भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) पाहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळी देखील ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी, राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानानंतर भाजपमधील कोणीच कसलीही टिप्पणी केली नव्हती. मात्र, धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असे म्हटल्यानंतर भाजपचे नेते लगेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून लगेचच यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

'एकनाथ शिंदेंही जनतेच्या मनातले मुख्यमंत्री' या धैर्यशील माने यांच्या विधानानंतर भाजपमधील नेत्यांच्या लगेचच आलेल्या प्रतिक्रियामुळे त्यांनी केलेले हे विधान जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या माने यांच्या विधानानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan), नारायण राणे यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी केलेल्या प्रतिक्रिया खूपच लक्षवेधी आहेत.

एकनाथ शिंदे यांनी गेली दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पहिले आहे. त्यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहचले देखील आहे. त्यांची काम करण्याची कार्यपद्धती, नागरिकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत या गोष्टींमुळे ते केवळ शिवसेनेचेच नाही, तर सर्वसामान्य मतदारांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या काळातील काही योजना राज्यभरात लोकप्रिय ठरल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांच्या विषयी असलेल्या या सर्वच बाबी सत्ताधारी भाजपला खटकत आहेत. त्यामुळेच महायुतीमध्ये असंतोष दिसत आहे. त्यामधूनच महायुतीमध्ये एखाद्या वक्त्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रया येतात. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे यांची शिवसेना मित्र पक्ष आहेत. त्यामुळे दोघांची सत्तेतील आकांक्षा, राजकीय भविष्य आणि जनाधार यावरच या संबंधांची खरी कसोटी लागणार आहे. दुसरीकडे पुढील पाच वर्षानंतर महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना "मुख्यमंत्रिपद कुणाकडे?" हा मुद्दा पुन्हा एकदा वादाचा ठरणार आहे. ऐन निवडणूक काळात हा वाद पुन्हा नव्याने उफाळून येऊ शकतो.

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. माने यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. 'तुम्ही आग लावायचं काम करत आहात. आज चांगल्या ‌दिवशी मी उत्तर देणार नाही. आताचे जे राजकारणी आहेत, त्यातील मी जुना आहे.

एकनाथ शिंदे हे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजकारणात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री राहिले आहेत. बर वाईट कळत ना ? कशाला दोघात लावत आहेत. सांगा ना नांदा सौख्य भरे, तर बर होईल, असे राणे यांनी स्पष्ट करीत मानेंची कानउघडणी केली. मुख्यमंत्री कोण हे जनतेपेक्षा युतीतले नेते ठरवतात. जनतेच्या मनात कोण आहे यावर सरकार चालत नाही, असे राणेंनी सडेतोड आणि परखड उत्तर दिले.

या मानेंच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील टीका केली आहे. महाजन यांनी माने यांच्या वक्तव्यावर "शिस्तीत राहा, जास्त उड्या मारू नका" असा सूचक इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री कोण होणार? हे भाजप ठरवतो आणि युतीत कुणालाही एकहाती सत्तेचा दावा करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यासोबतच इतर भाजप नेत्यांनी माने यांचं हे वक्तव्य "वैयक्तिक मत" असल्याचे सांगून खोडून काढले आहे. तर दुसरीकडे काही भाजपच्या नेतेमंडळीने प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया न देता सोशल मीडियावर "लोकनेता असावा, पण त्यासाठी संघटन, विचार आणि अनुभव हवा" अशा पोस्ट टाकून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना टोमणे मारले आहेत. एकंदरीत माने यांनी केलेले हे वक्तव्य भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच फडणवीस यांचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया नेतेमंडळींकडून दिल्या जात आहेत. त्यामुळेच भाजप नेत्यांची अवस्था सहनही होईना,अन कोणाला सांगताही येईना अशीच झाली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT