K.P.Patil Sarkarnama
विश्लेषण

K.P.Patil News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'मशाल' हाती घेतलेल्या के. पी पाटलांच्या पराभवाची कारणं!

K.P.Patil defeat in Vidhansabaha Election : निवडणुकीत मिळालेल्या अपयशाने कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, हे शिवसैनिकांसह मतदारांनी दाखवून दिले आहे.

Rahul Gadkar

Radhanagari Assembly Constituency News : राज्यातील सत्ता बदलानंतर शिवसेना सोडलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना राधानगरीच्या मैदानात उतरली. मात्र तोडीसतोड उमेदवार न मिळाल्याने तीन पक्षातून आलेला उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेला आयात करावा लागला. त्यातून निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या.

विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे(Shivsena) वारं झालं. आदमापुरात मशालीची सभा विशाल झाली. पण मतदानाचा दिवस जसा जवळ आला तसा मशाल मावळली. निकालात आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेच्या चिन्हावर तिसऱ्यांदा निवडून आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा विशाल झाली मात्र निवडणुकीत मिळालेल्या अपयशाने कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, हे शिवसैनिकांसह मतदारांनी दाखवून दिले आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन लोकसभा विधानसभा निवडणुक प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फोडला आहे. मात्र यंदा शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फोडला खरा पण राधानगरी मतदार संघातील आयात केलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ हा नारळ फोडला. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महायुती सोबत गेलेले माजी आमदार के पी पाटील(KP Patil) हे ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कौल दिसताच माजी आमदार के पी पाटील यांची पाऊले विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळाली. तर निष्ठावंतांना डावलून ठाकरेंच्या शिवसेनेने के पी पाटील यांना उमेदवारी दिल्याचाही यावेळी आरोप. अखेर आमदार प्रकाश अबिटकर यांच्या विरोधात माजी आमदार के पी पाटील यांचा निभाव लागू शकला नाही.

माजी आमदार के पी पाटील यांचा पराभव का झाला? -

-ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून महायुती राष्ट्रवादीतून(NCP) आलेल्या के पी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

- ठाकरेंच्या शिवसेनेच्या पडत्या काळात निष्ठावंत शिवसैनिक मागे राहिले असताना कोणालाही विचारात न घेता के पी पाटील यांना उमेदवारी देणे महागात पडले.

-निष्ठावंत शिवसैनिकांची मनधरणी करण्यास के पी पाटील अपयशी ठरले.

-प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात ठोस वातावरण निर्मिती करण्यास अयशस्वी.

-के पी पाटील यांची राजकीय भूमिका फसवेगिरीची आहे. हे मतदारापर्यंत पोहोचवण्यास अबिटकर आणि ए वाय पाटील यशस्वी.

-राजकीय विश्वासहर्ता गमवल्याचा के पी पाटील यांच्यावर ठपका

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT