CM Mohan Yadav, Vishnu Dev Sai, Bhajan Lal Sharma Sarkarnama
विश्लेषण

Loksabha Election : तीन राज्यांतील मुख्यमंत्री निवडीत भाजपचा 'महाराष्ट्र पॅटर्न'

Maharashtra Political News : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीन राज्यात नेतृत्वात बदल करताना 'महाराष्ट्र पॅटर्न'चा अवलंब केला आहे.

Sachin Waghmare

BJP Political News :लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यानंतर भाजपने मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यातील मुख्यमंत्री बदल करत मोदींनी मोठा धक्का तंत्राचा वापर केला.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तीन राज्यात नेतृत्वात बदल करताना 'महाराष्ट्र पॅटर्न'चा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला साठ वर्षांपेक्षा कमी वयाचे दोन उपमुख्यमंत्री देत पंतप्रधान मोदी यांनी सोशल इंजिनीरिंगच्या फॉर्म्युलाचा वापर करीत अनेक संदेश दिले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांची नेहमीच वेगळे निर्णय घेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर, गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल व उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले पुष्कर धामी यांना मुख्यमंत्री पद देऊन पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच वेगळा मेसेज सर्वांसाठी दिलेला आहे. पक्षात नवनवे प्रयोग करत असताना पंतप्रधान मोदी यांचे अनेक निर्णय अनपेक्षित असतात.

दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रातही त्यांनी नवा प्रयोग केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून पक्षाने बलाढ्य नेत्यांना चकित केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit pawar ) हेही उपमुख्यमंत्री केले.

इतकेच नाही तर उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री केले. असा धोका फक्त भारतीय जनता पक्ष आणि फक्त मोदीच घेऊ शकतात, हे यातून सिद्ध केले.

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही दोन उपमुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला आजमावला आहे. यापूर्वी केशव प्रसाद मौर्य आणि प्रथम दिनेश शर्मा आणि त्यानंतर ब्रिजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता.

त्यामुळे हा फॉर्म्युला यशस्वीपणे काम करत असल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या तीन राज्यात नेतृत्वात बदल करताना 'महाराष्ट्र पॅटर्न'चा अवलंब केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री देत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव केली असल्याची चर्चा आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा (Bhajnlal sharma) व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे 58 वर्षाचे आहेत. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांचे वय 59 आहे. तीन राज्यातील मुख्यमंत्री 60 वर्षे पेक्षा कमी वयाचे आहेत.

विशेषता राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तर राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना संधी दिली आहे. तर वासुदेव देवनानी यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानमधील भजनलाल शर्मा यांच्या रूपाने ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री नेमण्यात आला आहे. राज्यात 13 टक्के ब्राह्मण समाज आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी दिया कुमारी या राजपूत समाजातून आहेत तर प्रेमचंद्र बैरवा हे एससी आहेत. अशा प्रकारे सोशल इंजिनिअरिंगचा बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे.

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री म्हणून विष्णूदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली. ते आदिवासी समाजाचे आहेत. या राज्यातील 29 विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचे वर्चस्व आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी अर्जुन साव हे ओबीसी तर विजय शर्मा हे ब्राह्मण समाजाचे आहेत. अशा प्रकारे या सर्वच ठिकाणी बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे.

तीन राज्यात धक्कातंत्र

दुसरीकडे मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्या रूपाने ओबीसी समाजाचा नेता मुख्यमंत्रीपदी नेमला आहे. या राज्यात ओबीसीची संख्या 60 टक्के पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे जगदीश देवडा हे अनुसूचित जातीचे तर राजेंद्र शुक्ला ब्राह्मण समाजातील नेते आहेत.

या दोघांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यामुळे या तीन राज्यातील धक्कातंत्र पाहता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून वेगवेगळे प्लॅनिंग केले जात आहे. हा त्याचाच एक भाग आहे.

लोकसभेसाठी काय रणनीती असणार ?

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या या तीन राज्यातील धक्कातंत्र पाहता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून वेगवेगळे प्लॅनिंग केले जात आहे. हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेसाठी मोदी सरकारची काय रणनीती असणार ? याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT