Subhash Deshmukh Statement : 'त्या' जाळपोळीत मराठा आंदोलकांचा...! सुभाष देशमुखांचे मोठे वक्तव्य

Assembly session : बीडमधील घटना ही काही समाजकंटकांनी घडवून आणली आहे. मात्र, त्या घटनेमुळेच मराठा समाजाच्या या आंदोलनाला गालबोट लागले आहे.
Subhash Deshmukh
Subhash Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाने यापूर्वीही शांततेत आंदोलने केली आहेत. आताही शांततेच आंदोलन करत आहेत. माझ्या घरावर दोनवेळा मोर्चे आले. मात्र ते दोन्ही मोर्चे शांततेत पार पडले. मी स्वत: आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. मात्र, बीडमधील घटना ही काही समाजकंटकांनी घडवून आणली आहे. मात्र, त्या घटनेमुळेच मराठा समाजाच्या या आंदोलनाला गालबोट लागले आहे. हे व्हायला नको आहे.

समाजकंटक याचा फायदा घेतात, त्यामुळे कारण नसताना मराठा समाज बदनाम होतोय, असे मत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh)यांनी व्यक्त केले. ते विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या चर्चेप्रसंगी बोलत होते.

देशमुख पुढे म्हणाले, चर्चा खुप संवदेनशील होत आहे. राजकारण सोडून वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र मराठा समाजाकडून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी का केली जात आहे, याच्या मुळापर्यंत गेल्यावर प्रतिकुल परिस्थितीला तोंड देणाऱ्या तरुणामधूनच आरक्षणाची मागणी केली जात असल्याचे लक्षात येते. सामान्य वर्गातील तरुणांना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनला यश आहे.

या समाजातील तरुण वर्ग पेटला आहे. हा समाज प्रतिकुल परिस्थितीतून जात आहे. या समाजाचा विद्यार्थी याला चांगले मार्क घेऊन सुध्दा त्याला शाळा महाविद्यालयता प्रवेश मिळत नाही, नोकरी मिळत नाही. त्यामुळे या तरुण वर्गाला आरक्षणाची गरज वाटत आहे. मुलांचे पीएचडी झाल्यावर उच्च शिक्षण घेतल्यावरही नोकरी लागत नसल्याने त्यांचे पालक आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळेच मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसून येत आहे.

Subhash Deshmukh
Security Breach in Lok Sabha : 'त्या' एका त्रुटीमुळेच संसदेत झाली घुसखोरी! माजी पोलिस महासंचालकांचं वर्मावर बोट

क्षत्रिय म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठा समाजात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आज त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्या समाजाने आजपर्यंत रयतेचे संरक्षण करण्याचे काम केले, त्या समाजाला आज सर्वांनी मिळून संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले तर चांगलेच आहे. मात्र त्यादिवशी आरक्षण देता आले नाही, तर सर्व सभागृहाने जरांगे पाटलांना विनंती करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेऊन यातून मार्ग काढावा, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

यापूर्वीसुद्धा अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिले आहे. त्यांच्यानंतर आता जरांगे पाटलांनी ती विश्वासहर्ता निर्माण केली आहे. त्यांना या आंदोलनातून काही मिळवायचे नाही.त्यांनी तो समाजाचा विश्वास कमावला आहे. आपल्या पैकी जरी अशा प्रकारे आंदोलनाचे नेतृत्व करायचे म्हटले तरी जनता आपल्यावर विश्वास ठेवत नाही. मात्र, जरांगे पाटलांनी तरुणांचा मराठा समाजाचा विश्वास संपादन केला आहे. मराठा समाजाला खात्री आहे, की ते मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, असेही मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय नेत्यांवर टीकाटिप्पनी होत आहेत. विशेषत: देवेंद्र फडणीवस यांच्यावर व्यक्तीगत टीका झाल्याचे प्रकार घडले आहे. मात्र, यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.

आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आऱक्षण देतीलच. मुख्यमंत्र्यांनीही तशी छत्रपती शिवाजी महारांजांची शपथ घेतली आहे. त्याला यश मिळेल. मात्र हे सर्व होत असताना व्यक्तीगत चुका न काढता वैयक्तीक टिपाटिप्पणी रोखणे गरजेचे असल्याचे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.

राज्यातील गरजवंत मराठा समाजाला कायदेशीर असे आरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच राज्यातील सर्व जाती धर्मांच्या लोकांनी गुण्या गोविंदाने राहण्यासाठी सभागृहातील सर्व सदस्यांनी मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही मत सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

(Edited by Sachin Waghmare)

Subhash Deshmukh
Maratha Reservation : ''मी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com