Mumbai News : पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार, पनवेलचे नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा आग्रह प्रकल्पग्रस्तांचा आहे. या विमानतळाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र, अद्यापही दिबांचं नाव या विमानतळाला दिले गेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे यासंदर्भात सरकारकडून मात्र आश्वासन दिले जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या विमानतळाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र, अद्यापही दिबांचं नाव या विमानतळाला दिले गेले नाही. त्यामुळे सर्वस्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पीएम नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा मुहूर्त शोधला असल्याची चर्चा आहे.
दि. बा. पाटील यांची मुले काय करतात ?
दि. बा. पाटील यांचा मोठा मुलगा अभय पाटील हा आगरी समाजातील पहिला आयआयटी इंजिनिअर होता. पदवी घेतल्यानंतर त्याला दिबा पाटलांनी सांगितले होते की नवी मुंबईत काँट्रॅक्टींग करायचे नाही. या परिसरात काम न करता इतरत्र काम करण्याचा मोलाचा सल्ला त्याला दिला होता. वडिलांना दिलेल्या शब्दाखातर त्यांनी याठिकाणी काही काम केले नाही. स्ट्रक्चरल डिजाईनमध्ये त्यांचे मोठे नाव आहे. पण ते नवी मुंबईच्या बाहेरच काम करीत असतात. दिबा पाटील यांच्या पत्नी देखील शिक्षिका होत्या.
त्याशिवाय त्यांची मोठी मुलगी शिक्षिका होती. सेवानिवृत्त होताना ती मुख्याध्यापक होती. त्याशिवाय त्यांची छोटी कन्या ही एका सधन कुटुंबात आहे. तर त्यांचे छोटे चिरंजीव अतुल पाटील हे देखील राजकारणापासून दूरच आहेत. दिबा पाटील यांनी त्याकाळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घडविले. त्यांना कार्यकर्ते घडवायचे होते, त्यामुळे त्यांनी घरातील कोणत्याच व्यक्तींना राजकारणात आणले नाही. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले.
दिबा पाटील यांच्यामुळे अनेकजण खासदार व आमदार झाले. त्यामुळे या ठिकाणी झालेला प्रत्येक खासदार व आमदार त्यांच्या विचारसरणीशी मिळताजुळता असाच राहिला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास विरोध केला नाही. कामोठे येथील घर नागरिकांनीच 50 वर्षापूर्वी बांधून दिले आहे. आजही त्यांचे कुटुंब हे त्यांच्या याच घरात राहते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत कुटुंबाला आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. त्यासाठी अनेक दिवसापासून लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या मागणीनंतर झालेली बैठक, त्यात केंद्र सरकारकडे दि. बा पाटील यांचे नाव पाठवण्यात आले होते.
त्यामुळे बुधवारी पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. पण प्रत्यक्ष कार्यक्रमात दि. बा पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी पसरली आहे. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी नावाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पण सरकारकडून आताच नाव जाहीर करण्यात येणार नाही. आता विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्ष उड्डाण डिसेंबर महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे घोषणा करण्यास दिरंगाई होत आहे.
त्याशिवाय महापालिका निवडणूक जानेवारी महिन्यात होणार आहेत. नवी मुंबई आणि पनवेल या महापालिका डोळ्यासमोर ठेवून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दि. बा. पाटील यांच्या नावाबाबतची घोषणा होऊ शकते असे सांगितले जाते. आताच घोषणा केली असती तर प्रकल्पग्रस्तांची नाराजी दूर झाली असती पण निवडणुकीपर्यंत बराच वेळ गेला असता. त्यामुळे जसा हवा तसा फायदा घेता आला नसता. त्यामुळे दि. बा. पाटील यांच्या नावाबाबतची घोषणा येत्या काळात होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.