Balasaheb thackeray, chhagan bhujbal, Narayan Rane Sarkarnama
विश्लेषण

Balasaheb Thackeray News: नारायण राणे, छगन भुजबळांचे पक्ष वेगळे तरी बाळासाहेब ठाकरेंवर श्रद्धा कायम

Narayan Rane, Chhagan Bhujbal Political News : गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी गुरुबद्दल प्रत्येकजण कृतज्ञता व्यक्त करत असतो. यानिमित्ताने राज्यातील दिग्ग्ज राजकारण्यांनी त्यांच्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Sachin Waghmare

Mumabai News : गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी गुरुबद्दल प्रत्येकजण कृतज्ञता व्यक्त करत असतो. यानिमित्ताने राज्यातील दिग्ग्ज राजकारण्यांनी त्यांच्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त जरी सध्या भाजपमध्ये आलेल्या खासदार नारायण राणे व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांनी गुरु म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षातून राजकारणातील कारकि‍र्दीला सुरुवात केली. नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाचे धडे घेतले. राणे यांनी सदैव बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी मानत कार्य केले. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. बाळासाहेबांनी त्यांना नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे राणे यांचे बाळासाहेबांशी घट्ट नाते जुळले होते. मात्र, 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली.

त्यानंतर ते जवळपास दहा वर्ष काँग्रेसमध्ये राहिले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये (Bjp) आले. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यानंतर ही नारायण राणेंची श्रद्धा अजूनही बाळासाहेब ठाकरेंवरच आहे. नारायण राणे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त खास पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरेंवरील श्रद्धेचं उदाहरण दिले आहे.

याआधीही नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त गुरु, पितृतुल्य, बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली देणारी पोस्ट लिहिली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणे गुरु बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भाजपचे खासदार नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नारायण राणे यांनी एक्स मीडिया म्हणजेच आधीच्या ट्विटरवर खास पोस्ट केली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स मिडिया अकाऊंटवरुन बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्वीट केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasheb Thackeray) यांना सध्या राज्य मंत्रीमंडळात मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळही गुरुस्थानी मानतात. सुरुवातीला शिवसेनेत असताना बाळासाहेबांनी त्यांना नगरसेवक, महापौर, आमदार अशी विविध पदावर संधी दिली. मात्र 1991 साली त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. त्यांनतर 1998 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेमध्ये गेले तर त्यानंतर जुलै 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटासोबत जाणे पसंत केले.

या सर्व पक्षातरानंतर भुजबळ यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायम आहे. मधल्या काळात काही कारणावरून दोघामध्ये काहीकाळ वितुष्ट आले होते. त्यानंतर भुजबळ यांनी दिलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा बाळासाहेबांसोबत घनिष्ट संबंध प्रस्थापित केले. त्यांनी ही गुरु-शिष्य नातेसंबंध कायम जपले आहेत.

शिवसेना सोडून छगन भुजबळ गेल्यानंतर त्यांच्यातील नात्यात काही काळ कटुता आली होती. 1995 साली शिवसेना-भाजपने श्रीकृष्ण कमिशन स्थापन केले होते, त्यात बाळासाहेबांवर अनेक ठपके ठेवण्यात आले होते. भुजबळ यांनी त्यावेळेला निवडणूक ठाकरेंच्या विरोधात लढली होतो. त्यावेळेस श्रीकृष्ण आयोगानुसार कारवाई करू, असे वचन त्यांनी जनतेला दिले होते. भुजबळ गृहमंत्री झाल्यानंतर ती जुनी फाईल पुन्हा दाखल करण्यात आली.

त्या फाईलवर त्यांनी सही केली. त्यावेळी भुजबळांच्या मनात सुडाची भावनाही नव्हती. भुजबळांनी अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या अधिकारात सांगितलं होतं की, बाळासाहेबांना जामीन मिळाला नाही, तर बाळासाहेबांना त्यांच्या मातोश्रीवरच नजरकैदेसारखं ठेवण्यात यावे,असे सांगण्यात आले होते सुदैवानं त्यांना सोडण्यात आले.

रमाईनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. आंदोलन झालं. अकरा जणांचा मृत्यू झाला. सरकारनं हे खून पाडले, अशी भूमिका घेत भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विरोधीपक्ष नेता असल्याने भुजबळांच्या घरावर हल्ला झाला. त्यानंतर घरावर हल्ला करणाऱ्यांवर खटला चालला.

भुजबळ तुरुंगात असताना हा खटला संपला. दुसरीकडे गुंडेवार कमिशनची स्थापना झाली होती. हे कमिशन पुतळ्याची खरोखर कुणी विटंबना केली, फायरिंग कुणी केली याची चौकशी करत होते. त्यामध्ये छगन भुजबळाचा काही दोष नाही हे सिद्ध झालं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गुंडेवार यांनी सांगितले.

त्यानंतर भुजबळ यांनी बाळासाहेबांवर अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला, कारण ते 'सामना'चे संपादक होते. दहा-अकरा वर्षं तो खटला चालला. 2009 च्या दरम्यान हा खटला अगदी शेवटच्या टप्प्यात आला. त्यावेळेस सुभाष देसाई आणि संजय राऊत यांनी भुजबळ यांची भेट घेतली. पत्र दिलं त्यांनी 'साहेबांची तब्येत आणि वय पाहाता आपण सहकार्य करायला पाहिजे'. त्यानंतर भुजबळ कोर्टात गेले. न्यायाधीशांपुढे हात जोडले त्यांनी मला हा खटला चालवायचा नाही, असे म्हणत खटला मागे घेतला.

त्यानंतर भुजबळ यांना दोन दिवसांनी बाळासाहेबांचा फोन आला. सहकुटुंब जेवायचं आमंत्रण त्यांनी दिले. मुलाबाळांना, सुनांना घेऊन भुजबळ हे मातोश्रीवर गेले. तीन तास त्याठिकाणी होते. त्या काळात त्या दोघातील सगळी कटुता संपून गेली. त्यानंतर २०१३ साली बाळासाहेबांचे निधन झाले. त्यानंतरही छगन भुजबळ व नारायण राणे यांनी या गुरू-शिष्य नात्याबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आजही शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शनासाठी गर्दी करतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT