Rahul Gandhi  Sarkarnama
विश्लेषण

Assembly Elections : राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चा 'या' राज्यांत करिष्माच दिसला नाही

Sachin Waghmare

2023 Assembly Elections Results in Marathi : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले. त्यामध्ये तीन राज्यांत भाजपने तर एक राज्यात काँग्रेसने बाजी मारली. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत प्राप्त करीत वर्चस्व प्राप्त केल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे, तर दुसरीकडे तीन राज्यांतील नऊ जिल्ह्यांतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र, त्यांच्या या भारत जोडो यात्रेचा करिष्मा मात्र निकालात कुठेच पाहावयास मिळाला नाही.

विधानसभा निवडणूका पार पडलेल्या तेलंगणातील विकाराबाद, हैदराबाद या दोन तर मध्य प्रदेशातील महू, इंदूर, उज्जैन या तीन जिल्ह्यांतून तर राजस्थानमधील झालावार, अलवर, कोटा, दौसा या चार जिल्ह्यातून अशी तीन राज्यांतील नऊ जिल्ह्यांतून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र, त्यांच्या या भारत जोडो यात्रेचा करिष्मा मात्र निकालात फारसा कुठेच पाहावयास मिळाला नाही.

तीन राज्यांत काँग्रेसला मोठया पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कर्नाटकमधील निवडणुकीप्रमाणे त्यांच्या यात्रेचा परिणाम जाणवला असता तर काँग्रेसला यश मिळाले असते. मात्र, तेलंगण वगळता राजस्थान, छत्तीसगडमधील पराभव काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी स्वतंत्रपणे लढली होती. काँग्रेसने या ठिकाणी काही जागांवर समाजवादी पक्षासोबत आघाडी केली असती तर निकालात वेगळे चित्र पहावयास मिळाले असते, त्यामुळे येत्या काळात काँग्रेसने (Congress) झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर 2022 पासून ही यात्रा सुरू केली होती. ही यात्रा 12 राज्यांमधून गेली होती. या यात्रेने 136 दिवसांच्या कालावधीत चार हजार किलोमीटरचे अंतर कापले होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली. यामध्ये भारत जोडो यात्रेचे मोठे यश होते.

तेलंगणातील 19 पैकी 15 ठिकाणी काँग्रेस उमेदवार पराभूत

तेलंगणातील भारत जोडो यात्रा गेलेल्या मतदारसंघाचा विचार करता विकाराबाद जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी चार ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. तर हैदराबाद भागातील 15 मतदारसंघापैकी 15 ठिकाणी काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आहेत. यामध्ये ७ ठिकाणी बीआरएस,7 जागी एमआयएम व एक ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेला अपयश

विदर्भातून मध्य प्रदेशात दाखल झालेली राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा मात्र मध्य प्रदेशात निकालामध्ये अपयशी ठरल्याचे जाणवले. मध्य प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रा 12 दिवस होती. या यात्रेने तब्बल 386 किलोमिटर प्रवास केला. या कालावधीत बुरहानपूर, खंडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि आगर माळवा जिल्ह्यातून यात्रा सुरू झाली होती. मध्य प्रदेशमधील भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही प्रवास केला होता. मात्र, यात्रेचा मध्य प्रदेशात पाहिजे तेवढा सकारात्मक परिणाम आतार्यंतच्या निकालातून दिसून आला नाही.

राजस्थानात यात्रेचा प्रभाव नाही

4 डिसेंबर 2022 रोजी आगर माळवा जिल्ह्यातून यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाली. राहुल गांधी यांच्या राजस्थानमधील झालावार, अलवर, कोटा, दौसा या चार जिल्ह्यांतून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र त्या ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघातील निकालात फारसा प्रभाव जाणवला नाही.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT