Uddhav Thackeray Raj Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Thackeray brothers unity : ठाकरे बंधूंच्या एकीच्या नांदीची तारीख, वेळ अन् ठिकाणही निश्चित? मुद्दा, भूमिकाही एकच...!

Thackeray family reunion News : हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूनी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येत्या काळात पन्हा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : हिंदी सक्तीविरोधात राज्यातील सर्व मराठी भाषिकांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषिकांच्या दृष्टीने गुरुवारचा दिवस महत्वपूर्ण ठरला आहे. महायुती सरकारकडून हिंदी भाषेची सक्ती करण्याबाबत एकीकडे पावले उचलली जात असतानाच या मुद्द्याला विरोध करण्यासाठी येत्या काळात ठाकरे बंधू एकवटण्याची शक्यता दिसत आहे. गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून आलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना हिंदी सक्ती हे महाराष्ट्राविरोधातील कट असल्याचे सांगत मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व पक्षीयांनी सहभागी होण्याचे आवाहन केले तर दुसरीकडे 7 जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूनी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येत्या काळात मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. हा मोर्चा ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचवेळी राज ठाकरे यांनी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे वक्तव्य करीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बंधू उद्धव ठाकरेंना टाळी दिली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ऐकत येण्याच्या चर्चा सुरु असताना राज ठाकरे व सीएम फडणवीस यांच्या भेटीने एकत्र येण्याच्या चर्चा बंद झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर पुन्हा एकत्र चर्चा सुरु झाल्या आहेत.

येत्या काळात मुंबई महापलिकेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणुकीसाठी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपची मदार हिंदीभाषिक मतदारावर आहे तर मनसे व ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मराठी भाषिकांची मते महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हिंदी भाषा सक्ती करता आली नाही तर भाजपला निवडणूक जड जाणार आहे. त्यामुळेच ऐन निवडणूक काळात हा मुद्दा कळीचा ठरणार असल्यानेच ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केली आहे.

त्यातच मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात गुरुवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे व ठाकरे सेनेने आंदोलन, मोर्च्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्याची तारीख आधी 6 जुलै अशी होती मात्र आषाढी एकादशी असल्याने या तारखेत बदल केला आहे. दुसरीकडे 29 जून आणि 7 जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन मोर्चे किंवा आंदोलनं नको तर एकच मोर्चा निघालाय हवा, त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसेच्या मोर्चात सहभागी व्हावे, असा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या निमित्ताने मनसे व ठाकरे सेना एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. कोणत्या भाषेला विरोध नाही. कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कोणतीही भाषा आम्ही लादून घेणार नाहीत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी काही सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंशी मोर्चाबाबत बोलणार का ? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला होता. यावेळी त्यांनी आमची माणसं त्यांच्या माणसाशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले. इतक्या दिवस मी जे बोलत होतो ना, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ते तुम्हाला मोर्चाच्या निमित्ताने कळेल, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दोन पावले पुढे टाकली आहेत. त्यांनी भविष्यात मनसेसोबत युती करायची का अशी विचारणा खासदार, आमदार व संघटनेच्या नेतेमंडळींकडे केली आहे. त्याबाबतचा संघटनात्मक अहवाल देखील महिनाभरात मागवला आहे. मात्र, दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यामुळे युतीच्या बोलण्याविषयी शंका उपस्थित केली जात होती. त्यातच आता पुन्हा राज ठाकरे यांनी देखील एक पाउल पुढे टाकल्याने दोन बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

दुसरीकडे मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्याची तारीख आधी 6 जुलै अशी होती मात्र आषाढी एकादशी असल्याने या तारखेत बदल केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन मोर्चे किंवा दोन आंदोलने नको तर एकच मोर्चा निघालाय हवा. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसेच्या मोर्चात सहभागी व्हावे, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या नेत्याकडे पाठवला आहे.

त्यामुळे आता येत्या काळात उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार व कसा प्रतिसाद देणार यावरून हा मोर्चा ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी ठरणार अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सर्वांना 5 जुलैला होत असलेल्या मोर्चात काय होणार ? याची उत्सुकता आहे. तर या मोर्चाच्या निमित्ताने मराठी माणूस म्हणून कोण-कोण एकत्र येणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT