Uddhav Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray News : उद्धवजी, शिवसैनिकांना तुम्ही फक्त भाषण, टाळ्या अन् शाब्दिक टोलेबाजीपुरतेच नकोय; तर...

Shivsena Politics : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अंधेरीतील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ नेहमीप्रमाणे धडाडली. त्यात अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यावरही ठाकरेंनी चांगलेच तोंडसुख घेतले.पण त्यांच्या मेळाव्यातील भाषणात लोकसभा आणि विधानसभेचाच 'टच' दिसून आला.

Deepak Kulkarni

Shivsena News : शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे सामोरे गेले. ते ही शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाविना. लोकसभेला दोन अंकी खासदाराचा आकडाही गाठू न शकलेल्या ठाकरेंनी विधानसभेआधी चांगली वातावरण निर्मिती केली होती. पण जे इतके दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत घडलं, तेच यावेळी उद्धव ठाकरेंबाबत झालं. सभेला प्रचंड गर्दी, पण त्याचं मतात रुपांतर करण्यात आलेलं अपयश यामुळे त्यांना विधानसभेला अवघ्या 16 जागा जिंकता आल्या.या पराभवानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषणाला उभे राहिले.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अंधेरीतील उद्धव ठाकरे शिवसेना (Shivsena) पक्षाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ नेहमीप्रमाणे धडाडली.त्यात अमित शाह-एकनाथ शिंदे यांच्यावरही ठाकरेंनी चांगलेच तोंडसुख घेतले.पण त्यांच्या मेळाव्यातील भाषणात लोकसभा आणि विधानसभेचाच 'टच' दिसून आला.

उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात झालेला पराभव मान्य टीका टिप्पणीवर कमी भर द्यायला हवा होता. तसेच सातत्यानं मी हिंदुत्व सोडलं नाही याचा नारा देण्याचीही गरज नव्हती.अमित शाह पुढील मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसैनिकांना मी तुमच्यासोबत असल्याचा आत्मविश्वास देऊन पक्षसंघटन,पक्षाची पुढची वाटचाल यांसारख्या भर द्यायला हवा होता.

शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. विशेषत: विधानसभा निवडणुक निकालानंतर एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी महायुतीकडे काठावरील बड्या बड्या नेत्यांचा ओढा वाढला आहे. अशा परिस्थितीत ज्याच्या जायचंय त्यांनी जावं अशाप्रकारचं वक्तव्य हे कुठंतरी आत्मघातकीपणाचं लक्षण वाटतं. उलट जे आहे त्यांची वज्रमूठ कशी राहील याची काळजी घेणं संघटनेसाठी तितकंच महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्रात महायुतीनं प्रचंड बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी टेन्शनमध्ये आलेली महायुती आणि त्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सध्या भरभक्कम स्थितीत आहे. त्याचमुळे शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकीय नेत्यानं या वयातही दौरे, पक्षसंघटन, भेटीगाठी,मेळावे, बैठका यांनी पक्षासह कार्यकर्त्यांना एकप्रकारे आपण हार मानली नसल्याचा मोठा मेसेज दिला आहे. तसेच राजकारणात परिपक्क्वता आणि लवचिकता दाखवत अजित पवारांशी मतभेद असतानाही त्यांच्यासोबतचा संवाद सुरू ठेवला आहे.

आगामी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत जरी उद्धव ठाकरेंनी दिले असले तरी ते सोपं नाही याची जाणीव त्यांना नक्कीच असणार आहे. बीएमसी निवडणुकीत गेल्यावेळीच भाजपनं अडचणीत आणले होते, आता तर समोर भरभक्कम महायुती आणि भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना असल्यानं ठाकरेंना त्यांचं तगडं आव्हान परतवून लावण्यासाठी काही ठोस पावले उचलावी लागणार आहे. कारण यावेळी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे.

उद्धव ठाकरेंना काही बदल स्वीकारावे लागणार आहे.नुसतं टीकेचे राजकारण सोडावे लागणार आहे. पक्ष नुसता टीकेवर चालत नाही. आजही सामान्य शिवसैनिक ठाकरे आणि मातोश्रीशी आपलं इमान राखून आहे.बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या नसानसांत ठासून भरलेली निष्ठा शिवसैनिक इतक्या लवकर सोडणार नाही. पण ठाकरेंनी त्या निष्ठेची जाणीव नुसती संकटात सापडल्यावर ठेवता कामा नये.

जसे शिंदेंच्या बंडानंतर मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी खुले झाले आहेत.ते कायम राहायला हवे. नाहीतर शिवसेना सोडताना कित्येक नेत्यांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी कित्येकदा मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागल्याचं, ताटकळत बसावं लागल्याचं उदाहरणं दिली होती. कित्येकदा महत्त्वाच्या कामासाठी केलेल्या फोन किंवा मेसेजला कितीतरी दिवस,कुणीतरी रिप्लायच न आल्याची खंतही बोलून दाखवलं होतं.

आता राजकारण पूर्ण बदललं आहे.नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांना त्यांच्यातला नेता हवा आहे. त्यांच्या अडीअडचणी,संकटात सुख-दु:खांत मिसळणारा नेता हवा आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेणारा ,त्यांच्याशी थेट कनेक्ट असलेला नेत्यालाच ते उचलून धरतात. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंना आपलं राजकारण,सभा, मेळावे,बैठका पुरते मर्यादित न ठेवता खुलं करावं लागणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त झालेल्या मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ती म्हणजे त्यांनी एकीकडे अमित शाह आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ले चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवला. मध्यंतरीच्या काळात फडणवीस आणि त्यांच्यात निर्माण झालेली प्रचंड राजकीय कटुता कुठेतरी काल कमी झाल्यासारखी भासली. आधी सामना, नंतर संजय राऊत,आदित्य ठाकरेंकडून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं.

राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कायमचा मित्रही नसतो, हे ब्रीदवाक्य राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. ठाकरेंना आता आपला राजकीय अनुभव पणाला लावून आगामी काळात बेरजेचं राजकारण करावं लागणार आहे. सोबत असलेल्या शिवसैनिकाची ताकद सोबत घेऊन पुन्हा उभारीसाठी मैदानात उतरावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT