Anna Hazare on Dhananjay Munde : राज्य सरकारवरील दबाव वाढणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अण्णा हजारेंचे सूचक विधान

dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे वक्तव्य केल्याने त्यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यासाठी येत्या काळात राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.
anna hajare, dhananjay munde
anna hajare, dhananjay munde sarakrnama
Published on
Updated on

Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात असलेला निकटवर्तीयाचा सहभाग आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेत मोठे विधान केले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे वक्तव्य केल्याने त्यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यासाठी येत्या काळात राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून मुंडे यांच्या विरोधात भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपाची राळच उठवली आहे. या मंडळींकडून दररोज नवनवीन प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी कोर्टात धाव घेत त्यांच्या विरोधात खंबीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

anna hajare, dhananjay munde
Dharashiv Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय? गृहखातं 'टार्गेट',सरनाईकांची नाचक्की अन् ठाकरेंसाठी पुन्हा सहानुभूती..?

या प्रकरणात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. अण्णा हजारे यांनी शुक्रवारी अहिल्यानगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणी मोठे विधान केले आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरून सरकारवरील दबाव वाढला आहे.

anna hajare, dhananjay munde
Dharashiv Politics Controversy : प्रताप सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; तानाजी सावंतांच्या जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी घेतला मोठा निर्णय

मंत्री धनंजय मुंडे आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी हजारे यांना विचारणा झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. अण्णा हजारे यांनी कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे नाव घेत नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याने स्वतःचीच इमेज वाढते, असेही हजारे म्हणाले.

anna hajare, dhananjay munde
Congress in Action Mode : सपकाळांच्या 'एन्ट्री'नंतर मरगळलेली काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर; पहिलं मिशनही ठरलं? पुण्याबाबत मोठा निर्णय

राज्य मंत्रीमंडळात घेण्याआधी अशा मंडळींचा विचार करणे गरजेचे आहे. मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध असले पाहिजेत. सुरवातीला हे चुकलं की नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, समाजाचे देशाचं नुकसान होते. याचा विचार करणं गरजेचे असल्याची प्रतिकिया हजारे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता या सगळ्यावर धनंजय मुंडे काही प्रतिक्रिया देणार का, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anna hajare, dhananjay munde
Ajit Pawar: अजितदादांच्या अडचणी वाढणार; धनंजय मुंडेंनंतर आणखी एका शिलेदारावर टांगती तलवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com