Dr.Bhagwat Karad : कराड यांचे स्वप्न भंगले; आता नांदेड, हिंगोली, परभणीच्या प्रचारात रमले..

Sambhajinagar संभाजीनगरची जागा भाजपला मिळावी यासाठी कराड यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण उमेदवारी मिळवण्यात त्यांना यश आले नाही.
Bhagwat Karad, Sandipan Bhumre
Bhagwat Karad, Sandipan Bhumresarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेची उमेदवारी मिळाली यासाठी गेल्या अडीच- तीन वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांचे स्वप्नअखेर भंगले. संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे घेत संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज भागवत कराड यांनी त्यांच्याकडे असलेल्या नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात स्वतःला गुंतवून घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कराड या तीन मतदारसंघात रमलेले पाहायला मिळाले. संघटनात्मक जबाबदारी हा भाग असला तरी संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याची नाराजी हेही कारण त्यांच्या स्वतःला गुंतवून घेण्यामागे असल्याचे बोलले जाते. संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्याची तीव्र इच्छा आणि तयारी डाॅ. भागवत कराड यांनी केली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांनी जिल्हाभरात संपर्क वाढवण्यावर भर दिला होता.

विरोधक कराड यांच्यावर ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाही, अशी टीका करत होते. पण गेल्या वर्ष-दीड वर्षात कराड यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. बॅंकाचे जाळे आणि आर्थिक क्षेत्राशी निगडित विषयात कराड संपूर्ण जिल्हा फिरले. या शिवाय संघटनात्मक पातळीवर बूथ स्तरावरील बांधणी, शक्ती केंद्र प्रमुख, पन्नाप्रमुख ही यंत्रणा कराड यांनी सशक्त केली होती.

Bhagwat Karad, Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar Constituency : अंबादास दानवेंच्या समोरच देशमुख म्हणाले, खैरेंचा निर्णय पटत नाही

केंद्रातील मोदी सरकारच्या योजना गावागावात पोचवण्यासाठी काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून कराड यांनी आपण जिल्ह्यातील अकरा लाख मतदारांपर्यंच पोहाेचण्याचा दावा केला होता. भाजप संभाजीनगरची जागा शंभर टक्के जिंकू शकते, असा दावा सातत्याने कराड करत होते. संभाजीनगरची जागा भाजपला मिळावी यासाठी कराड यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण उमेदवारी मिळवण्यात त्यांना यश आले नाही.

त्यामुळे लोकसभा खासदार होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन झाल्यानंतर कराड शहरातून गायब झाले. ते परभणी, हिंगोली, नांदेड या तीन मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत फिरत आहेत. संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उमेदवार कोणीही असो, आम्ही त्याला निवडून आणू, असं छाती ठोकपणे सांगणारे कराड आता मात्र, काहीसे लांब लांब राहत असल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhagwat Karad, Sandipan Bhumre
Bhagwat Karad News : लोकसभेच्या उमेदवारीसाठी कराडांकडून देवाचा धावा!

कराड यांच्याकडे जबाबदारी असलेल्या नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या भागात प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. प्रचार संपल्यानंतर आणि मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर कराड संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसतील, असे बोलले जाते.

Edited By : Umesh Bambare

R

Bhagwat Karad, Sandipan Bhumre
Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात संदीपान भुमरे देणार खैरे, इम्तियाज जलील यांना आव्हान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com