Chhatrapati Sambhajinagar Constituency : अंबादास दानवेंच्या समोरच देशमुख म्हणाले, खैरेंचा निर्णय पटत नाही

Amit Deshmukh : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज (सोमवारी) मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यासाठी अमित देशमुख संभाजीनगरात आले होते.
Ambadas Danve chandrakant khaire Amit Deshmukh
Ambadas Danve chandrakant khaire Amit Deshmukh sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : चंद्रकांत खैरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत खैरे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले आहे. खैरेंच्या या निर्णयाचे आश्चर्य जाहीर सभेत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे संपुर्ण जिल्ह्यात, मराठवाड्यात आणि घराघरात संपर्क असणारे नेते आहे. त्यामुळे त्यांनी मी पुढची निवडणूक लढवणार नाही, ही घेतलेली भूमिका आपल्याला पटत नसल्याचे स्पष्ट मत अमित देशमुख यांनी व्यक्त केले. देशमुख यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर बसलेल्या शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या.

Ambadas Danve chandrakant khaire Amit Deshmukh
Ashok Chavan On Nana Patole : अशोक चव्हाणांचा पटोलेंवर गंभीर आरोप, त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले

शेतीमालाला भाव नाही, बेरोजगारी कमी झालेली नाही, महागाई वाढत आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत. सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. या त्रस्त सर्वसामान्य जनतेचे दुःख कमी करण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करेल, त्यासाठी तुम्हाला सर्वसामान्यांचे सरकार आणायचे आहे, असे आवाहनही देशमुख Amit Deshmukh यांनी केले.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे chandrakant khaire यांनी आज (सोमवारी) मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यासाठी अमित देशमुख संभाजीनगरात आले होते. शहागंज येथे झालेल्या सभेत देशमुख यांनी संभाजीनगरच्या निवडणुकीची चर्चा दिल्लीत असल्याचे सांगितले. या शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे.

दरम्यान, शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम हा त्याच्या उत्कृष्ट नियोजनासाठी ओळखला जातो. परंतु आज खैरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीपासून ते समारोपाच्या सभेपर्यंतचे नियोजन ढासळल्याचे चित्र दिसून आले. सकाळी दहा वाजल्यापासून जमलेल्या शिवसैनिक, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा उकाड्यामुळे घामटा निघाला. सभा रस्त्यावर झाल्यामुळे भर उन्हात टाकलेल्या खुर्च्यावर बसलेल्यांची गैरसोय झाली.

शिवाय शक्ती प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष गाडीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्याची स्पर्धा नेत्यांमध्ये लागल्याने फळ्या तुटून सगळे खाली कोसळले. आदित्य ठाकरे यांना किरकोळ मार लागल्याचीही चर्चा होती. एकूणच या शक्ती प्रदर्शनात नियोजनाचा अभाव दिसून आला. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उत्कृष्ट नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जात असतांना नियोजन कसे ढासळले? याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.

(Edited By Roshan More)

Ambadas Danve chandrakant khaire Amit Deshmukh
Hingoli Loksabha Constituency : प्रचाराला दोन दिवस उरले असताना पालकमंत्री सत्तार हिंगोलीत..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com