High Court News : तुळजाभवानी मंदिर दानपेटीतील अपहार; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश...

State Government राज्यशासनातर्फे पुन्हा प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नातून मंत्रालयातून एक अहवाल तयार करून घेऊन दोषींना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न झाला.
Tuljabhavani Mandir, High court
Tuljabhavani Mandir, High court sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : श्री. तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे आठ कोटी 46 लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी दोन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास करावा, असेही न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी आदेशात म्हटले आहे.

तुळजापूर (जि. धाराशिव) श्री. तुळजाभवानी संस्थानमध्ये नियमावली तयार केलेली नाही. दानपेटी कशी उघडायची, त्याचा हिशेब कसा ठेवायचा यासंबंधी कुठेच स्पष्टता नाही. भक्तांनी वर्ष 1991 ते 2009 या कालावधीत दान दिले. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

अपहार झाल्याची बाब धाराशिवच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषन विभागातर्फे 17 नोव्हेंबर 2017 रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता. या आहवालात आठ कोटी 46 लाख रूपयांचा अपहार झाल्याचे नोंद करण्यात आले होते. म्हणून राज्याच्या पोलिस महासंचालकांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

Tuljabhavani Mandir, High court
Chhatrapati sambhaji nagar Constituency: छत्रपती संभाजीनगरात तिरंगी लढत ; महायुती- आघाडी- एमआयएम भिडणार!

दरम्यान, खंडपीठात 96/2015 ही जनहित याचिका दाखल झाली होती. याचिकेच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर राज्यशासनातर्फे पुन्हा प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नातून मंत्रालयातून एक अहवाल तयार करून घेऊन दोषींना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न झाला.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

याविरोधात हिंदू जनजागृती समिती या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ संजय देशपांडे यांच्यावतीने खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीनंतर खंडपीठाने 27 सप्टेंबर 2017 व 21 फेब्रुवारी 2018 च्या अहवालाआधारे तुळजापूर पोलिस ठाण्यात दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Edited By : Umesh Bambare

Tuljabhavani Mandir, High court
Beed Crime News : दोन कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com