Nanded Political News : ओबीसी बहुजन पक्ष कोणाचा खेळ बिघडवणार ?

Loksabha Election ओबीसी बहुजन पक्षाच्या माध्यमातून राज्यात अनेक लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे.
OBC Loksabha
OBC Loksabhasarkarnama
Published on
Updated on

Nanded News : गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र, त्या आधारे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, तसेच सगेसोयऱ्यांना शपथ पत्रावर प्रमापणपत्र आणि आरक्षणाची मागणी लावून धरली. त्याविरोधात ओबीसी समाज एकवटला आणि त्यांनी राज्यभरात एल्गार पुकारला.

आता लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या विरोधात ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाने दंड थोपटले आहेत. ओबीसी बहुजन पक्षाच्या माध्यमातून राज्यात अनेक लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघात हजारो उमेदवारी अर्ज दाखल करून सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे.

या दोन्ही समाजाच्या भूमिकेचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात ओबीसींच्या वतीने आयोजित केलेल्या एल्गार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. नवे पर्व ओबीसी सर्व, असे म्हणत ओबीसींचेच आमदार, खासदार निवडून आले पाहिजेत, असा निर्धार या एल्गार मेळाव्यातुन करण्यात आला होता.

OBC Loksabha
Maratha Reservation : हायकोर्टाचा सदावर्तेंना झटका, मराठा आरक्षणाच्या स्थगितीला नकार; न्यायालय नेमकं काय म्हणालं?

ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी काही दिवसापूर्वी ओबीसी समाज पक्षाची स्थापना केली व काही उमेदवारांची घोषणा केली. यात नांदेडच्या जागेसाठी अॅड. अविनाश भोसीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ओबीसींच्या एल्गार मेळाव्यातून समाज एकटवला आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार निर्णायक ठरणार आहेत. भारतीय जनता पक्षाला ओबीसी मतदारांनी आतापर्यंत मोलाची साथ दिली आहे. पंरतु आरक्षणाच्या मुद्यावर लोकसभा निवडणुकीत हा समाज वेगळी भूमिका घेण्याच्या पावित्र्यात आहे. ओबीसी समाज पक्षाचा स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर‌‌ याचा फटाका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

OBC Loksabha
OBC Reservation News: ओबीसी राजकीय आघाडीची पहिली यादी जाहीर; असा आहे अजेंडा...

राज्यात मराठा समाजाचा आरक्षणच्या मागणीचा विषयी ऐरणीवर आहे. सकल मराठा समाजाचा रोष सत्ताधारी पक्षावर आहे. याचा फटकाही महायुतीसह त्यांच्या घटक पक्षांना बसणार आहे. नांदेड जिल्ह्यात अॅड. अविनाश भोसीकर यांनी सामाजिक चळवळीतून चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदार संघात बंजारा समाजाचे काही विधानसभा मतदारसंघात प्राबल्य आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारला फटका बसू शकतो.

Edited By : Umesh Bambare

OBC Loksabha
Nanded Loksabha : निवडणुकीचा पहिला दणका, नांदेडमध्ये जप्त केली लाखोंची रोकड, जातीचे मेळावे थांबवले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com