Sanjay Shirsat On Sharad Pawar : संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप; म्हणाले, भाजपसोबत जाण्याचा शरद पवारांचाच प्लॅन

Sanjay Shirsat : संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले.
Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay Shirsat
Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : जे संजय राऊत आज दिवस उगवला की पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर तोंडसुख घेतात, त्याच राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लावून भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेल्या शरद पवारांना साथ दिली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला. संजय राऊत हे आता पवार झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लावणे हा शरद पवार यांच्या स्क्रीप्टचा एक भाग होता. भावनिक राजकारण करून राजीनामा द्यायला लावयचा आणि भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा डाव होता. हे सर्व राजकारण शरद पवार करत असताना त्यांना संजय राऊत यांची साथ होती.

संजय राऊत हा कुणाचा माणूस असं विचाराल तर ते शरद पवारांचे खास आहेत, असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. पण पवारांची खेळी त्यांच्यावरच पलटवणारा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता त्यांना भारी पडला.

सत्तेपासून फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना दूर ठेवले म्हणून यांना पोटदुखी आहे. संजय राऊत हे पूर्णपणे शरद पवारांच्या ताब्यात गेले आहेत. त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांचे नाव फक्त एकदा येते.

Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay Shirsat
Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेच्या भाजपच्या संचालकाची अशी ही बनवाबनवी

शरद पवारांचे नाव संजय राऊत शंभर वेळा घेतात, असा टोला शिरसाट यांनी या वेळी लगावला. अयोध्येत राम मंदिर झाल्याचा आनंद यांना नाही, पण इथे जमिनीचे किती व्यवहार झाले असतील, आम्हाला न विचारता कसे झाले?

याची चिंता विरोधकांना वाटत असेल. राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत झालेल्या कारसेवेत शिवसैनिकांना पाठवले होते. गर्व से कहो हम हिंदू है चा नारा दिला होता, पण हे ठाकरे, राऊत विसरलेत.

निवडणुका आल्या की यांच्या तोंडून मुंबई तोडण्याची भाषा सुरू होते. चुकीच्या गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न सातत्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासारखी मंडळी करत असतात. नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा सुटलेला आहे, ही जागा शिवसेनेची आहे आणि ती आम्हीच लढवणार आहोत. अद्याप कोणत्याही उमेदवाराने फॉर्म भरलेला नाही. ज्यांनी कोणी अर्ज भरले आहे, त्यांना छगन भुजबळ यांचे समर्थन नाही, ते कोणत्याही दबावतंत्राचा वापर करत असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्यावरून विरोधक टीका करत आहेत. पण मोदीच्या राज्यात सभा होत आहेत, याचा आनंद वाटला पाहिजे. त्यांच्या सभा होतायेत याचा अर्त महाराष्ट्राचे महत्त्व वाढत आहे. उद्या आपले राज्य देशात एक नंबर असेल, असा दावा शिरसाट यांनी केला.

राज्यातील मराठा आरक्षणावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केले आहे. या शिवाय आरक्षणाचे जे प्रश्न प्रलंबित असतील, याबाबतही मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay Shirsat
PM Modi News: मोदींच्या गॅरंटीवर वातावरण टिकवून ठेवण्याचे महायुतीसमोर आव्हान

जरांगेंना लोकशाहीने दिलेला अधिकार...

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व 288 मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे शिरसाट यांचे लक्ष वेधले असता निवडणूक लढवण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिलेला नाही. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात चुकीचे काय आहे? त्यांचे स्वागत आहे, असेही शिरसाट म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay Shirsat
Manoj Jarange Solapur Tour : मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही सोमवारी सोलापुरात; कोणाला पाडायचा संदेश देणार?

महायुतीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे नियोजन सुरू असून, येत्या 10 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शहरात सभा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही शिरसाट यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

R

Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay Shirsat
Chhatrapati Sambhajinagar Constituency : दारूच्या दुकानांनी केली भुमरेंची गोची, शपथपत्र बदलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com