Uddhav Thackeray : साहेब, आम्हाला आत्महत्या करायला लावू नका..! ; ठाकरेंसमोर शेतकरी भावूक

Uddhav Thackeray : साहेब.. बँकेचा तगादा आहे. पण, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे.
CM Udhav Thackeray
CM Udhav Thackeraysarkarnama

औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेततमालाचे झालेल्या नुकसानीचा ठाकरे धांडोळा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा, मांडली. "साहेब, आम्हाला आत्महत्या करायला लावू नका, अशी कैफियत शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर ऐकवली.

CM Udhav Thackeray
मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर दीपाली सय्यद स्पष्टच बोलल्या...

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथे पोहचल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. शेतकरी बांधव ठाकरेंना म्हणाले की, "साहेब.. बँकेचा तगादा आहे. पण, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आम्ही हवालदिल झालो आहोत, काहीतरी करा साहेब.मदत करा, कर्ज माफ करा, आम्हाला आत्महत्या करायला लावू नका, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

CM Udhav Thackeray
तोंड सांभाळा नाहीतर..! चंद्रकांत खैरेंचे सत्तांरांना उत्तर

यावर ठाकरे म्हणाले की, "बांधवांनो धीर सोडू नका. आपलं सरकार असताना मदत पोहचत होती. मात्र आताच्या सरकारलाही मदत पोहचवायला भाग पाडू. तुम्ही धीर सोडू नका. अशा शब्दात ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com