M.G. Ramachandran : चित्रपटसृष्टी अन् राजकारणातलाही जादूगर!

M.G. Ramachandran sarkarnama Podcast : एम. जी. रामचंद्रन हे अत्यंत संवेदनशील होते. भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच अभिनेते होते.
M.G. Ramachandran
M.G. RamachandranSarkarnama
Published on
Updated on

असं सांगितलं जातं, की दक्षिणेतील बहुतांश लोक मनाने अधिक विचार कारतात. ते आपल्या आवडत्या नेत्यांवर, चित्रपट कलाकारांवर जिवापाड प्रेम करतात. दक्षिणेतील काही राज्यांत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अनेक कलाकारांनी राजकारणात उतरूनही लोकांचं प्रचंड प्रेम मिळवलं आहे. तमिळ चित्रपटसृष्टीते सुपरस्टार, सलग 10 वर्षे तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले एमजीआर या नावानं ओळखले जाणारे एम. जी. रामचंद्रन हे त्यापैकीच एक नाव. अत्यंत संवेदनशील असलेल्या एमजीआर यांना मरणोत्तर 'भारतरत्न'नं सन्मानित करण्यात आलं.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि नंतर बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज दिलेल्या एमजीआर यांनी तमिळनाडूतील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ते चित्रपटांच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून. त्यांच्या निधनानंतर लोकांनी केलेला आक्रोश हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देणारा होता. एमजीआर यांना लोकांनी 'मक्काली थिलगम' म्हणजेच लोकांचा राजा अशी उपाधी दिली होती. वयाच्या 19 व्या वर्षी एमजीआर यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. अभिनेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास रंजक आहे.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एमजीआर हे लोकप्रिय चित्रपट अभिनेते होते. एम. करुणानिधी यांच्याशी मतभेद निर्माण झाल्यानंतर द्रविड मुनेत्र कळघम या पक्षातून बाहेर पडून त्यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम म्हणजेच एआयएडीएमके या पक्षाची स्थापना केली. 1972 मध्ये स्थापन केल्यानंतर पाच वर्षांत म्हणजे 1977 च्या निवडणुकीत त्यांना सत्ता मिळाली आणि ते मुख्यमंत्री बनले. चित्रपट अभिनेत्री ते राजकारण असा प्रवास केलेल्या जयलिलता यांची राजकीय जडणघडण एमजीआर यांच्याच नेतृत्वात झाली होती. एमजीआर यांनी 1977 ते 1987 अशी दहा वर्षं तमिळनाडूचं मुख्यमंत्रिपद भूषवलं.

मरुथूर गोपालन रामचंद्र असं एमजीआर यांचं पूर्ण नाव. एमजीआर यांचा जन्म 17 जानेवारी 1917 रोजी श्रीलंकेतील कँडी जिल्ह्यातील नवलपिटिया येथे झाला. त्यांचे वडील मेलकथ्थ गोपालन मेनन हे तेथे शिक्षक म्हणून नोकरी करत. मरुथूर सत्यभमा असं त्यांच्या मातुःश्रींच नाव. एमजीआर दोन वर्षांचे झाल्यानंतर 1919 मध्ये त्यांचे कुटुंबीय भारतात परतले. चक्रपाणी, बालकृष्णन हे एमजीआर यांचे भाऊ तर कमलाची आणि सुबत्र या दोन बहिणी. एमजीआर हे सर्वात लहान होते. चक्रपाणी आणि एमजीआर वगळता अन्य भांवडांचं बालपणीच निधन झालं होतं.

M.G. Ramachandran
Pakistani Citizens : डेडलाइन संपली! अजूनही पाकिस्तान्यांंनी भारत सोडला नाही तर काय होणार कारवाई ? महत्त्वाची माहिती समोर

भारतात परतल्यानंतर एमजीआर यांच्या वडिलांनी मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरू केले. आजारपणामुळे 1920 मध्ये त्यांच निधन झालं. त्यावेळी एमजीआर 3 तर चक्रपाणी 9 वर्षांचे होते. पतीच्या निधनानंतर सत्यभामा या दोन्ही मुलांसह त्यांचा भाऊ नारायणन यांच्याकडे आल्या. तेथेच दोन्ही मुलांचं शिक्षण सुरू झालं. मुलांच्या पालनपोषणासाठी सत्यभामा यांना संघर्ष करावा लागला. त्यांना घरकाम करावं लागलं. नारायणन हे एका नाटक मंडळीत काम करत होते. या मंडळात तरुणांना काम करण्याची संधी मिळत असे. मामांमुळे चक्रपाणी यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली. तशीच संधी एमजीआर यांनाही मिळाली.

एमजीआर यांनी शालेय जीवनापासूनच नाटकांत काम सुरु केलं. ते एका नाटक मंडळीत सहभागी झाले. तेथे त्यांनी नृत्य, गायन, तलवारबाजीचंही प्रशिक्षण घेतलं. त्यांनी परदेशातही कला सादर केली. त्यात त्यांना महिलांचं पात्रही साकार करावं लागलं. त्यानंतर ते भारतात परतले आणि पुन्हा नाटक कंपनीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांना मुख्य भूमिका निभावण्याची संधी मिळाली. एमजीआर यांचं बालपण संघर्षातच गेलं. त्यातूनच पुढं त्यांचं व्यक्तिमत्व आणि राजकीय कारकीर्दीची जडणघडण झाली.

एमजीआर यांनी तीन विवाह केले. त्यांचं पहिलं लग्न चितारीकुलम बरगवी ऊर्फ थंगमणी यांच्याशी झालं. आजारपणामुळं त्यांच निधन झालं. नंतर त्यांनी सत्यानंदवती यांच्याशी विवाह केला. त्यांचंही निधन झालं. व्ही. एन. जानकी यांच्याशी एमजीआर यांचं तिसरं लग्न झालं. जानकी या तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या. एमजीआर यांच्या निधनांतर काही दिवस जानकी यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं. एमजीआर यांना एकही अपत्य झालं नाही. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि एमजीआर यांच्या नात्याचीही सातत्यानं चर्चा झाली. राजकारणात येण्यापूर्वी जयललिता अभिनेत्री होत्या. एमजीआर आणि जयललिता यांच्या जोडीनं अनेक हिट चित्रपट दिले.

M.G. Ramachandran
Pakistan enemies : भारत एकटा नाही, तर हे देशही आहेत पाकिस्तानचे शत्रू...कारण काय?

एमजीआर यांनी 1936 मध्ये 'साथी लीलावती' या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी ते अवघ्या 19 वर्षांचे होते. अमेरिकन वंशाचे एलिस आर. डंगन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या भूमिकेसाठी एमजीआर यांना 100 रुपये आगाऊ रक्कम मिळाली होती. ही रक्कम त्यांनी तताडीनं आपल्या आईला पाठवली होती. आपल्याला वाढवण्यासाठी आई करत असलेल्या संघर्षाची त्यांना जाणीव होती. या चित्रपटानंतर त्यांना मुख्य भूमिका मिळू लागल्या. 1936 ते 1947 दरम्यान त्यांनी बोटावर मोजण्याइतक्या चित्रपटांत काम केलं, मात्र त्यातूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी हे चित्रपट पटकथा लेखकही होते. करुणानिधी यांची पटकथा असलेल्या एका चित्रपटात एमजीआर यांनी भूमिका साकारली आणि त्या चित्रपटाला मोठं व्यावसायिक यश मिळालं. पुढे 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मलाईक्कलन' या चित्रपटातील भूमिकेमुळं एमजीआर यांची लोकप्रियता वाढली. एमजीआर यांनी एका खेडूताची भूमिका केलेला 'राजकुमारी' हा चित्रपट 1947 मध्ये आला होता. त्यावेळेसपासूनच त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख चढता होता.

1973 मध्ये आलेला त्यांचा 'उलगाम सुत्रम वलिबन' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड समजला जातो. बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले. त्या काळात आताच्यासारखं परदेशांत चित्रीकरण होत नव्हतं. काही मोजक्याच चित्रपटांचं परदेशात चित्रीकरण केले जात असे. उलगाम सुत्रम वलिबन या चित्रपटाचं थायलंड, मलेशिया, सिंगापूर, जपान आणि हॉंगकॉंगमध्ये चित्रीकरण झालं होतं. त्यांच्या अभिनयाची कारकीर्द 1987 मध्ये 'उल्लागम सुथी पारू' या चित्रपटाद्वारे थांबली. हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. मूत्रपिंड विकाराशी झुंजत त्यांनी चित्रीकरण पूर्ण केलं होतं.

M.G. Ramachandran
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे किती वाढेल पगार? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

एमजीआर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील जादूगारच होते. त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. त्यांच्या चित्रपटांनी यशाचे, उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले. चाहते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. अॅक्शन, रोमँटिक हीरो म्हणून ते स्थापित झाले होते. एमजीआर यांचा 'अलीबाबावुम 40 थिरुदरगलम' हा तमिळ आणि दक्षिण भारतातील पहिलाच पूर्ण लांबीचा रंगीत चित्रपट. 1954 मध्ये प्रदर्शित 'अलीबाबा और 40 चोर' या हिंदी चित्रपटाचा तो रिमेक होता. यासह त्यांच्या 'मदुराई वीरन', 'चक्रवर्ती थिरूमगल' आणि 'महादेवी' आदी चित्रपटांनाही मोठं यश मिळालं.

एमजीआर यांचे चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात सातत्यानं यशस्वी ठरले. त्यांचं प्रेक्षकांशी अतूट नातं निर्माण झालं होतं. अभिनयक्षेत्रात प्रचंड यश, प्रेम मिळालेल्या एमजीआर यांना राजकीय क्षेत्रही खुणावत होतं. अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असताना ते डीएमके पक्षाच्या संपर्कात आले. निवडणुकीत एमजीआर यांच्या सभांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असे. या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होऊ लागलं. करुणानिधी आणि एमजीआर यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण होते, मात्र ते शेवटपर्यंत टिकू शकले नाहीत.

एमजीआर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. 12 जानेवारी 1967 रोजी निर्माते के. एन. वासू मुथुकुमारन, अभिनेते एम. आर. राधा यांच्यासह एका चित्रपटाच्या प्रकल्पावर ते चर्चा करत होते. त्यावेळी राधा अचानक उठले आणि त्यांनी एमजीआर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर राधा यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही चेन्नईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वेळेवर उउपचार मिळाल्यामुळं दोघांचाही जीव वाचला. या प्रकरणात राधा यांना न्यायालयानं चार वर्षे 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

M.G. Ramachandran
Narmdeshwar Tiwari : भारत-पाकिस्तान युद्धात वायुदलाची जबाबदारी बिहारच्या पुत्रावर, उपप्रमुखपदी नियुक्ती झालेले तिवारी कोण?

1969 च्या विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूत डीएमकेची सत्ता आली. एम. करुणानिधी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले. या निवडणुकीत डीएमकेला जे यश मिळालं त्यात एमजीआर यांचा वाटा महत्त्वाचा होता. एमजीआर यांनी पक्षासाठी, करुणानिधी यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. त्यांचं भाषण झालं की लोक उठून जात. लोकांमध्ये एमजीआर यांच्याबात क्रेझ आहे, लोक त्यांच्या भाषणाचे चाहते आहेत, याची जाणीव करुणानिधी यांनाही झालीच होती. त्यांच्यात दरी निर्माण होण्यासाठी हे कारण ठरलं.

एमजीआर यांना टाळलं जाऊ लागलं. पक्षाच्या बैठकांनाही त्यांना बोलावलं जात नव्हतं. अभियन, चित्रपट क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. हा बदल एमजीआर यांच्या लक्षात आला होता. एके दिवशी ते डीएमकेच्या कार्यलयात गेले आणि त्यांनी मंत्रिपद देण्याची मागणी केली. अर्थातच, पक्षानं त्यांची मागणी फेटाळून लावली. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. यामुळं एमजीआर यांच्या राजकीय आकांक्षा दबल्या नाहीत, त्या उफाळून आल्या आणि त्यांनी 1972 मध्ये ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अर्थात एआयएडीमके पक्षाची स्थापना केली.

पूर्वी एमजीआर हे काँग्रेसचे सदस्य होते. सी. एन. अण्णादुराई यांनी डीएमकेची स्थापना केली होती. अण्णादुराई यांचे आकर्षण असल्याने एमजीआर हे डीएमकेत गेले. तमिळनाडूत वेगाने पसरत असलेल्या द्रविड आंदोलनाला एमजीआर यांच्यामुळं आणखी गती मिळाली. ते 1962 मध्ये विधान परिषदेचे सदस्य बनले. त्यानंतर 1969 च्या निवडणुकीत ते विधानसभेत पोहोचले. अण्णादुराई यांच्या मृत्यूनंतर ते पक्षाचे कोषाध्यक्ष आणि करुणानिधी हे मुख्यमंत्री बनले. करुणानिधी यांना मुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी एमजीआर यांनी पुढाकार घेतला होता.

M.G. Ramachandran
Chhagan Bhujbal Politics: भुजबळांचा रोख कोणावर?, माझ्या हातात असते तर, केव्हाच पालकमंत्री नेमला असता!

1977 च्या विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमके-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आघाडीनं 144 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. पक्षाची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत एमजीआर यांच्या करिष्म्यानं काम केलं होतं. करुणानिधी यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तमिळनाडूसाठी ही निवडणूक एेतिहासिक ठरली. एमजीआर यांच्या एआयएडीएमकेला 130 जागा मिळाल्या. डीएमकेला 136 जागांचा फटका बसला आणि त्यांचे केवळ 48 उमेदवार विजयी झाले. या निकालानं एमजीआर यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. 30 जून 1977... भारतातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एक अभिनेता आरूढ होण्याची ही पहिलीच वेळ होती. पुढे 1987 पर्यंत एमजीआर मुख्यमंत्रिपदावर राहिले. ते हयात असेपर्यंत डीएमकेची सत्तेत वापसी होऊ शकली नव्हती.

मुख्यमंत्रिपदाच्या काळात एमजीआर यांनी शिक्षण, सामाजिक न्यायावर लक्ष केंद्रीत केलं होतं. शाळकरी मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजनेत पौष्टिक पदार्थाचा समावेश केला. त्या काळात 1 लाख 20 हजार मुलांना याचा फायदा झाला होता. त्यांनी महिलांसाठी खास बससेवा सुरू केली. जुनी मंदिरं आणि एेतिहासिक स्मारकांच संवर्धन करण्यात आलं. त्यामुळं पर्यटकांची संख्या वाढली आणि राज्याच्या उत्पन्नातही वाढ झाली. चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली.

1984 च्या निवडणुकीत ते प्रचार करू शकले नव्हते, तरीही त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. गंभीर आजारावर ते अमेरिकेत उपचार घेत होते. इकडे जयललिता यांनी मोर्चा सांभाळला होता. त्यांच्या अनुपस्थितीतही पक्षाला मिळालेलं यळ हे त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देणारं होतं. बरे होऊन ते परत आले. मात्र पुन्हा त्यांना आजारानं घेरलं. त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. 24 डिसेंबर 1987 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या चाहत्यांना शोक अनावर झाला. त्यांच्या मृत्यूचा धक्का असह्य झाल्यानं अनेक चाहत्यांनी आत्महत्या केली होती.

M.G. Ramachandran
BJP Politics : भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया म्हणजे दोन सख्खा चुलत भावांसह चंद्रकांत पाटलांसाठी परीक्षा

एमजीआर यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच त्यांच्या अनेक चाहत्यांनी हातांच्या शिरा कापून घेतल्या. काहजणांनी स्वतःला पेटवून घेतलं. काहीजणांनी विष प्राशन केलं. आत्महत्या केलेल्या चाहत्यांची संख्या 30 सांगितली जाते. अत्यंसंस्कारावेळी झालेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. त्यात 29 जणांचा मृत्यू झाला होता. अंत्यदर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीतून हा प्रकार घडला होता. 49 पोलिस जखमी झाले होते. एमजीआर यांच्या अंत्यदर्शनासाठी 12 लाख लोकांची गर्दी झाली होती, 10 किलोमीटर रांग लागली होती.

एमजीआर यांच्या निधनानं जयलिलता या सैरभेर झाल्या होत्या. त्यांना एमजीआर यांचं अंत्यदर्शन घेण्यास जानकी यांनी मज्जाव केला होता. त्या धावत पळतच घरी पोहोचल्या, मात्र मृतदेह कुठे आहे, हे त्यांना सांगण्यात आलं नाही, त्यांचा अपमान केला गेला. त्यानंतर जयललिता राजाजी हॉलमध्ये पोहोचल्या, तेथे एमजीआर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दोन दिवस ठेवलं जाणार होतं. कोणतीही हालचाल न करता जयललिता या 21 तास एमजीआर यांच्या मृतदेहाजवळ रडत उभ्या होत्या. अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर त्यांनी शववाहिकेत चढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ढकलून देण्यात आलं. एमजीआर आणि जयललिता यांचं एकमेकांवर प्रेम होत, मात्र त्यांचा विवाह होऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com