Nashik MLC: माघार घेतली, प्रचार थांबवला, तरीही गितेंचा समर्थकांसह फेरफटका सुरुच; नरेंद्र दराडे गोंधळले?

Gokul Geete withdrawing from Nashik MLC Election Campaign: गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला असला तरी पाठिंबा जाहीर केलेला नाही. वाढलेल्या मतदार अपेक्षा, संभाव्य क्रॉस व्होटिंग आणि नाराजीमुळे नरेंद्र दराडेंसमोरील आव्हाने कायम असल्याची चर्चा आहे.
Gokul Geete withdrawing from Nashik MLC Election Campaign
Gokul Geete withdrawing from Nashik MLC Election CampaignSarkarnama
Published on
Updated on

Gokul Geete News: नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला आहे, मात्र आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत होणारी पारंपरिक जादू चालते की काय ही शंका वाढली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने नाशिक मतदार संघ माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर दराडे यांच्या अडचणीत मोठी भर पडली. प्रतिस्पर्धी उमेदवार गोकुळ गीते यांनी दराडे यांची वाट खडतर केली होती.

या संदर्भात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी माघार घेण्यासाठी परिश्रम घेतले. महायुती सरकारच्या दबावामुळे गीते यांनी प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले. मात्र तीन मंत्र्यांसमोरच पाठिंबा देण्याचा कोणताही शब्द देण्याचे टाळले.

या पार्श्वभूमीवर नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांची संपर्क केला आहे. विरोधात उमेदवार नसले तरी दराडे यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.

Gokul Geete withdrawing from Nashik MLC Election Campaign
Jalgaon MLC Election: जळगावचा तिढा अखेर सुटला! शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंनी घेतली माघार

दराडे यांची झोप उडाली

विधान परिषद निवडणुकीत 619 मतदार आहेत. मध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे ४६६ मतदार आहेत. या मतदारांना व्हीप बजावण्याची तरतूद या निवडणुकीत नाही. आजवरच्या विविध निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होत आले आहे. हा अनुभव गाठीशी असल्याने नरेंद्र दराडे यांची झोप उडाली आहे.

कळीचा मुद्दा

आमदार दराडे यांच्या विषयी अपक्ष उमेदवार गीते यांनी गंभीर आरोप केले होते. विशेषता आमदार दराडे यांनी मतदारांना गृहीत धरले होते. गेल्या सहा वर्षात त्यांचा मतदारांशी कोणताही संपर्क नाही. याची जाणीव उपमुख्यमंत्र्यांपासून पक्षाच्या सर्वच नेत्यांना उशिरा झाली. हा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

Gokul Geete withdrawing from Nashik MLC Election Campaign
Nashik MLC Election: गोकुळ गीते यांची माघार, भाव मात्र गिरीश महाजन यांचा वधारला

चेहऱ्यावर दिसणारे हसू त्याचे प्रतीक तर नाही ना?

गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरीही शेवटच्या दोन दिवसात जादूची कांडी फिरू शकते. ही चिंता मात्र कायम आहे. सध्या विविध भागात समर्थकांसह फेरफटका मारणाऱ्या गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू त्याचे प्रतीक तर नाही ना? ही चर्चा महायुतीला अस्वस्थ करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com