अपघातात १४ पैकी १३ जणांचा मृत्यू : रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही

सर्व मृतदेहांची ओळख DNA चाचणीद्वारे केली जाणार
Bipin Rawat
Bipin RawatSarkarnama

कुन्नूर (तमिळनाडू) : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी तमिळनाडूतील कुन्नूरजवळ अपघात झाला. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह एकूण १४ जण प्रवास करत होते. मात्र या अपघातात आता या १४ जणांपैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तर बिपीन रावत यांच्या प्रकृतीबाबत अजूनही भारतीय वायूसेना किंवा संरक्षण मंत्रालय यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच पेट घेतला. त्यामुळे घटनास्थळी मोठी जिवीतहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व मृतदेहांची ओळख DNA चाचणीद्वारे केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Bipin Rawat
CDS रावत यांच्या निवासस्थानी कडक सुरक्षा, कार्यक्रम रद्द करुन राष्ट्रपती दिल्लीला

या अपघातातनंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. रावत यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच काही वेळापूर्वी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही रावत यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी रावत यांच्या कुटुंबियांना दुर्घटनेची माहिती दिली असून या आणीबाणीच्या प्रसंगी संपुर्ण देश रावत यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असल्याचा विश्वास दिला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. यानंतर राजनाथसिंग यांनी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरावणे यांच्यासोबत बैठक घेतली आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह सविस्तर माहिती उद्या संसदेत देणार असल्याचेही समजते आहे.

Bipin Rawat
सर्जिकल स्ट्राईक आणि २६/११ चे मैदान : अपघातग्रस्त MI-17V5 ची वैशिष्ट्ये

तर राष्ट्रपती रामनाथ कोविंदही मुंबईतील आपला नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वाजता राजभवनात नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन करण्यात येणार होते. मात्र हा कार्यक्रम स्थगित करुन ते दिल्लीला गेले आहेत. तसेच राज्यसभेचे कामकाजही उद्या म्हणजेच ९ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक समितीची आज संध्याकाळी ६:३० वाजता बैठक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com