Jammu Kashmir Government : तब्बल 25 आमदारांची बंडखोरी, सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांना 14 दिवसांचा अल्टिमेटम

CM Omar Abdullah : आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा ते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.
Omar Abdullah
Omar AbdullahSarkarnama
Published on: 
Updated on: 

Omar Abdullah News : तब्बल 25 आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जम्मू-काश्मीरमधील सरकार संकटात आले आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना या आमदारांनी 14 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या विषयीचे वृत्त 'आज तक'ने प्रसिद्ध केले आहे. सरकारमधील बदलांकडे दुर्लक्ष केले तर या आमदारांनी थेट राज्यपालांकडे जात पाठींबा मागे घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील मंत्रिमंडळात बदल झाले होते. या बदलामध्ये अनेक वरिष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर नाराज असलेल्या आमदारांनी एकत्र येत बैठक घेतली होती. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा देण्यात आला होता.

बंडखोर आमदारांनी मागणी केली आहे की, सध्याच्या मंत्र्यांना त्यांच्या मंत्रि‍पदावरून हटवण्यात यावे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांना देखील हटवले जावे. तसेच आमदारांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाची नियुक्ती केली जावी.

'आज तक'च्या वृत्तात म्हटले आहे की, आमदारांकडून मागणी करण्यात येत आहे की, मंत्रिमंडळाची निवड ही केवळ काही वरिष्ठांच्या मर्जीनुसार केली जाऊ नये. मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्यासाठी आमदारांना देखील विश्वासात घेतले जावे.

Omar Abdullah
उमर अब्दुल्ला 56 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; कोण आहे दुसरी पत्नी; समोर आले खास फोटो!

कलम 370 आणि 35A बाबत निर्णय घ्या

बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तr करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विशेष करून कलम 370 आणि 35A सह अन्य संविधानिक सुरक्षा संवैधानिक सुरक्षा पुन्हा मिळायला हवी.त्यासाठी हे मुद्दे केंद्र सरकारपुढे मंजबूतीने मांडायला हवेत.

Omar Abdullah
उमर अब्दुल्ला 56 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; कोण आहे दुसरी पत्नी; समोर आले खास फोटो!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.