Delhi Assembly Election : दिल्लीतील विजयाचा आम आदमी पार्टीला भलताच कॉन्फिडन्स; निकालाआधीच जाहीर केली विजयी रॅली

Aam Aadmi Party : महाराष्ट्र जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. निवडणूक आटोपली असल्याने आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपने किती आरोप-प्रत्यारोप केले, निर्बंध आणले तरी दिल्लीत आपच जिंकणार असल्याचा दावा कार्यकर्त्यांचा आहे.
Delhi Assembly Election
Delhi Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 06 February : दिल्लीमध्ये सरकार कोणाचे येणार, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार का? भाजपच्या विजयाच्या दाव्यांमध्ये किती तथ्य याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. निवडणुकीनंतर एक्झिट पोलने भाजपचे सराकर येणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वत्र अनिश्चितता असताना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मात्र ‘दिल्ली सरकार येणार’ असा ठाम विश्वास आहे. त्याकरिता निकालाच्या दिवशी आठ फेब्रुवारीला नागपूरमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने विजयी रॅली काढणार असल्याचे जाहीर केले. विजयी यात्रेचा मार्गही ठरविण्यात आला आहे.

आपचे सरकार असताना दिल्लीमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक मंत्र्यांची जेलवारी झाली आहे. मद्य घोटाळाही गाजला. केंद्रातील भाजप सरकार आणि आम आदमी पार्टी यांच्यात प्रचंड वाद झाले. राज्यपाल नियुक्त असो वा दिल्लीतील पोलिस सुरक्षा यावर नेहमीच आरोप प्रत्यारोप झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या प्रचारात अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याचा उल्लेख शिशमहल असा केला होता. केजरीवाल यांनी आपल्या बंगल्यावर केलेली कोट्यवधींच्या उधळपट्टीचे व्हीडिओ व्हायरल करण्यात आले होते. विशेष म्हणजे दिल्ली काबिज करण्याचे भाजपचे (BJP) प्रयत्न केजरीवाल यांनी उद्‌ध्वस्त केले होते. तेव्हापासूनच दोन्ही पक्षातून विस्तव जात नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दिल्लीत जिंकण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

Delhi Assembly Election
Ajitdada-Bhujbal : अजितदादांचा छगन भुजबळांना फोन; दिलगिरी व्यक्त करत दिला हा ‘शब्द’

महाराष्ट्र जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. निवडणूक आटोपली असल्याने आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपने किती आरोप-प्रत्यारोप केले, निर्बंध आणले तरी दिल्लीत आम आदमी पार्टीच जिंकणार असल्याचा दावा कार्यकर्त्यांचा आहे. आठ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Delhi Assembly Election
Ranjitsinh Mohite Patil : मोहिते पाटलांना भाजपकडून अभय?; बावनकुळेंच्या कौतुकापाठोपाठ फडणवीसांचीही घेतली भेट!

ऐनवेळी धावपळ नको; म्हणून विजयाच्या जल्लोषाचे नियोजन आपच्या नागपूरमधील पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विजय यात्रा काढण्यात येणार आहे. आपचे शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनी आपच जिंकणार आहे, याची आम्हाला कुठलीच शंका नाही. दिल्लीतूनही नेत्यांनी विजयोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे आम्ही विजयी यात्रेचे नियोजन करीत असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com