Ajitdada-Bhujbal : अजितदादांचा छगन भुजबळांना फोन; दिलगिरी व्यक्त करत दिला हा ‘शब्द’

NCP Dispute : मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनाला यावे, हे सांगण्यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे यांचा फोन आला होता.
Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Chhagan Bhujbal-Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 February : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर नाराज होते. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ते उघडपणे टीका करत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांची नाराजी दूर झाल्याचे दिसून येत होते. त्याचे कारण आता उघड झाले आहे. खुद्द भुजबळ यांनीच अजित पवार यांच्याबाबत खुलासा केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनाला यावे, हे सांगण्यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे यांचा फोन आला होता. तसेच चार दिवसांपूर्वी मला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचासुद्धा फोन आला होता. मी फार उशिरा फोन करतोय, त्याबद्दल दिलगिर आहे, असेही त्यांनी मला फोनवर सांगितले.

आपण एकदा बसून बोलूया, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यावर मी त्यांना ठीक आहे, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा आपण चर्चा करू, असे मी त्यांना म्हटले आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. नाराजी कमी झाली आहे का, याबाबत मात्र छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी मिश्किल उत्तर दिले. आता थर्मामीटर लावून बघतो आणि तुम्हाला सांगतो की नाराजी एवढे टक्के वाढली आणि एवढे टक्के कमी झाली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Ranjitsinh Mohite Patil : मोहिते पाटलांना भाजपकडून अभय?; बावनकुळेंच्या कौतुकापाठोपाठ फडणवीसांचीही घेतली भेट!

राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होती, त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझे काम होते. त्यामुळे मी सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. ते काम मुख्यमंत्र्यांचे होते, त्यात उपमुख्यमंत्रीही काही करू शकत नव्हते, त्यामुळे मी फडणवीसांना भेटायला गेलो होतो, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने छगन भुजबळ हे नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी ओबीसी नेत्यांची भेट घेतली होती. तसेच कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला होता. मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी अजित पवार यांना भेटायचे टाळले होते. मात्र, पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते.

Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Income Tax Raid : अजितदादांचे निकटवर्तीय पुन्हा इनकम टॅक्सच्या रडारवर; पण,‘त्या’ भूमिकेचीही चर्चा!

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होता. त्यातूनच भुजबळ यांनी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती. मात्र, त्यांची संपूर्ण नाराजी दूर झाली का नाही, हे मात्र त्यांच्या ताज्या विधानावरून स्पष्टहोऊ शकले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com