AAP News: जेलवारी करुन आलेले AAP चे दोन माजी मंत्री पुन्हा अडचणीत; गृहमंत्रालयाने उचललं मोठ पाऊल; काय आहे प्रकरण

Home Ministry action on AAP leaders: केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा एक आदेश जारी केला आहे. दोन्ही नेत्यांवर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या कार्यकाळात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी होणार आहे.
Home Ministry action on AAP leaders
Home Ministry action on AAP leadersSarkarnama
Published on
Updated on

दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्याविरोधात भष्ट्राचार प्रकरणी खटला चालविण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी मद्यविक्री धोरण गैरव्यवहारात मनीष सिसोदिया यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. तर दुसरे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी केली जात आहे.आता वर्गखोल्या बांधकाम धोरण गैरव्यवहारात दोघांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा एक आदेश जारी केला आहे. दोन्ही नेत्यांवर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या कार्यकाळात झालेल्या भष्ट्राचाराची चौकशी होणार आहे.

Home Ministry action on AAP leaders
Tamil Nadu : तमिळ-हिंदी वादाला तोंड फुटलं; '₹' चिन्ह हटवलं; अर्थमंत्री संतापल्या!

गृहमंत्र्यालयाच्या सचिवाकडून हे आदेश काढण्यात आले आहे. २०२२ मध्ये दिल्ली सरकारच्या दक्षता आयोगाने याबाबतची चौकशी करण्याची शिफारस केली होती.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मनीष सिसोदिया तर ऑक्टोबर महिन्यात सत्येंद्र जैन यांचा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सिसोदिया 17 महिने जेलमध्ये होते. तर जैन यांना 2022 मध्ये अटक करण्यात आली आहे. सध्या ते जेलमध्ये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com