पणजीतून लढण्यावर ठाम असलेल्या पर्रीकरांसाठी 'आप'नं टाकला गळ!

गोवा विधानसभा निवडणुकीआधी (Goa Election 2022) भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Utpal Parrikar and Arvind Kejriwal
Utpal Parrikar and Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Elections 2022) तोंडावर तिकिट वाटपावरून भाजपमध्ये (BJP) सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) पणजीतून तिकिट देण्यास भाजपने नकार दिला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने (AAP) पर्रीकर यांनी पणजीतून लढण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे आता पर्रीकर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

गोव्याची भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असून, पर्रीकरांनी पणजीतून तिकिट देण्यात आलेले नाही. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar) पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर हे पणजीतून लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी मोठा निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहे. ते भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरच जाहीरपणे भूमिका मांडण्याचे त्यांनी म्हटले आहे. (Goa Political News)

भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले असतानाच आपचे संयोजक व दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पर्रीकर यांना खुली ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने वापरा आणि फेकून द्या या पद्धतीने राजकारण पर्रीकर कुटुंबासोबतही केल्याने गोव्यातील जनता दु:खी आहे. मी कायम मनोहर पर्रीकर यांचा आदर केला आहे. उत्पल पर्रीकर यांचे आमच्या पक्षात स्वागत आहेत. ते आमच्या पक्षात येऊन पणजीतून निवडणूक लढू शकतात. (Utpal Parrikar News Updates)

Utpal Parrikar and Arvind Kejriwal
भाजपचं जशासं तसं उत्तर! अखिलेश यादवांना घरातूनच आणखी एक धक्का

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला होता. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होती. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. (Utpal Parrikar News Updates)

Utpal Parrikar and Arvind Kejriwal
पडळकर शून्यावर बाद अन् भाजपचे सगळे उमेदवार 105 मतांवर ऑल आऊट!

पणजीच्या जागेवर सध्या भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी व विद्यमान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांना टालगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com