

राजधानी दिल्लीमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वास नगर परिसरात आम आदमी पार्टीचे नेते अभिषेक धिंगान यांच्या कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी सहा राउंड गोळीबार केलाय. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेत आरोपींनी एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यालयात कृष्णकांत हे प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतात. त्यांचे भाऊ अभिषेक हे आम आदमी पार्टीच्या युवा शाखेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आहेत. त्यांनीही याच ठिकाणी आपले कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे हल्लेखोरांनी नेमके कोणाला लक्ष्य केले होते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास स्कूटीवरून आलेले दोन तरुण दक्ष रोड परिसरात पोहोचले. येथे असलेल्या श्री महाकाल प्रॉपर्टीज या कार्यालयाला त्यांनी लक्ष्य केले. यावेळी त्यातील एका तरुणाने पिस्तूल काढून कार्यालयाच्या दिशेने सलग 3 गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी स्कूटीवरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच फर्श बाजार पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस उपायुक्त आर. पी. मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 9 वाजता गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक तपासणी केली.
दिल्लीतील राजकीय नेत्याशी संबंधित कार्यालयावर झालेल्या या गोळीबारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींना अटक कधी होणार आणि या हल्ल्यामागचे नेमके कारण काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.