भाजपला मोठा धक्का! 'आप'ने महापालिका निवडणुकीत धूळ चारली

महापालिका निवडणुकीत आपने मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या असून, भाजपल्या दुसऱ्या क्रमांकावर फेकले आहे.
BJP and AAP
BJP and AAPSarkarnama
Published on
Updated on

चंडीगड : पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भाजपला मोठा धक्का दिला आहे. चंडीगड महापालिका निवडणुकीत आपने मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या असून, भाजपल्या दुसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महापौरांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.

पंजाब (Punjab) आणि हरियाना (Haryana) या राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमधील (Chandigarh) महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. चंडीगड महापालिकेतील (Chandigad Municipal Corporation) 35 पैकी 14 जागा आपने (AAP) जिंकल्या आहेत. भाजप (BJP) 12 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस (Congress) 8 जागा मिळवत तिसरा स्थानी आहे. अकाली दलाला (Akali Dal) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे आधी महापौर असलेले रविकांत शर्मा आमि दवेश मौडगील हे दोघेपी आपच्या उमेदवारांकडून पराभूत झाले आहेत. आपलाही या निवडणुकीत एक धक्का बसला असून, प्रचार प्रमुख चंदरमुखी शर्मा पराभूत झाले आहेत.

BJP and AAP
बैलगाडा शर्यत घ्या, पण बैलाचे शेपटूही पिरगळता येणार नाही! नाही तर...

मागील महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाला एक जागा मिळाली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी तोडली होती. काँग्रेसला मागील निवडणुकीत 4 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने आता आपल्या जागा दुपटीने वाढवल्या आहेत.

BJP and AAP
नाराज आमदारांची व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट अन् भाजप नेत्यांची पळापळ

चंडीगडमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दरवेळी दिसून येते. या वेळी मात्र अपवाद झाला असून, आपने मुसंडी मारली आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आलेल्या असताना आपने आपली ताकद दाखवून दिली आहे. यामुळे भाजपसह काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत आप, भाजप, काँग्रेस, अकाली दल - बहुजन समाज पक्ष आघाडी अशी चौरंगी लढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com